साईमत, आडगाव ः प्रतिनिधी येथील प्रवीण नामदेव पवार यांच्या उसाच्या शेतात बिबट्या व त्याचे दोन बछडे आढळले. प्रवीण पवार यांचा मुलगा शिवप्रसाद ऊर्फ सोमनाथ हा शुक्रवारी (ता. २५) दुपारी चारच्या सुमारास उसाच्या शेतात काम करीत असताना बिबट्या व त्याचे लहान दोन बछडे आढळले. शिवप्रसाद हा कामात व्यस्त असताना बिबट्याने डरकाळी फोडली व त्याच्या अंगावर झडप घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने कसाबसा जीव वाचवत शेताबाहेर येऊन इतरांना माहिती दिली. दरम्यान, ग्रामस्थ येईपर्यंत मादी एका पिलाला घेऊन पसार झाली. दुसरे पिल्लू मात्र तेथेच असून, त्याला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Author: Saimat
साईमत, जळगाव : प्रतिनिधी संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली आहे. खान्देशात सर्वत्र दमदार पाऊसच झाला नाही. त्यामुळे पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७५ टक्के पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी लावलेली पिके जगवायची तरी कशी, असा महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील खान्देशातील तिनही जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची हजेरी लागलेली नाही. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दुसरीकडे खरीप हंगामाची पिके देखील धोक्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पिके जळून जाण्याच्या मार्गावर आली असून, पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन आठवड्यांपासून ७० ते ७२ हजार रुपयादरम्यान असलेल्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. आठवडाभरात ३ हजार ३०० रुपयांनी भाव वाढला आहे. त्यामुळे चांदीचे भाव ७४ हजार ३०० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार सुरू असून ते पुन्हा ५९ हजार रुपयांच्या पुढे जात ५९ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे.अधिक मास सुरू झाल्यानंतर सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर मात्र अधिक महिना संपताच त्यांचे भाव कमी झाले. चांदीचे भाव तर ७ ऑगस्टपासूनच कमी होत जाऊन ते ७० हजार २०० रुपयांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी त्यात एक हजार रुपयांची…
साईमत, बंगळुरू : प्रतिनिधी चांद्रयान-३ टीमच्या वैज्ञानिकांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी बंगळुरूमधील इस्रोच्या कमांड सेंटरमध्ये पोहोचले. येथे त्यांनी शास्त्रज्ञांची भेट घेतली. इस्रो कमांड सेंटरमध्ये इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी पीएम मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पंतप्रधानांनी सोमनाथ यांची गळाभेट घेतली आणि त्यांची पाठ कौतुकाने थोपटली. पंतप्रधान जेव्हा कमांड सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा शास्त्रज्ञांनी ५ मिनिटे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. इस्रो प्रमुखांनी प्रज्ञान रोव्हर चंद्रावर उतरल्याचे चित्र पंतप्रधानांना सादर केले. चांद्रयान-३ चे मॉडेल देऊन सन्मान केला. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचे बंगळुरूतील मुख्यालय…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री ना.धों. महानोर यांच्या गीतांवर आधारित “हिरवाई अन् निळाई जगलेले..” या कार्यक्रमाचे आयोजन कांताई सभागृहात दि. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आलेले आहे. महानोर हे गीतकार असलेल्या जैत रे जैत या चित्रपटातील सुमधुर गीतांचं गारुड आजही मराठी मनावर अधिराज्य करीत आहे. अशा या रानकवींना त्यांनी रचलेल्या कविता व अजरामर गीते गाऊन त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निसर्गाशी एकरूप झालेल्या या महाकवींच्या हृद्य आठवणी व गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित रहावे. ऐश्वर्या परदेशी, वैशाली शिरसाळे, अथर्व मुंडले,…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जागतिक व्यावसायिक बदलामुळे शैक्षणिक बदल घडून आले आहेत. पारंपरिक शिक्षण आणि नोकरी या पलीकडे जाऊन नवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत. या नव्याने उदयास येणाऱ्या क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधीत विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. तुमचे कौशल्य आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालून तुम्ही शिक्षणक्रम पूर्ण केला तर भविष्यात या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी प्राप्त होतात. तसेच उद्योजकता म्हणजे केवळ व्यवसायाच्या संकल्पना मांडणे, त्यावर काम करणे आणि त्याचा विस्तार करणे इतकाच नव्हे, तर जगावेगळा विचार करून आपले उत्पादन जगातील सर्वश्रेष्ठ उत्पादन बनवणे हा होय, असे प्रतिपादन मुंबई येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. डॉ.…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी जिल्हा आपत्ती निवारण आराखडा तयार करून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. यासाठी शासकीय विभागांनी समन्वय ठेवत तात्काळ उपाययोजनासह आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी येथे दिल्या. जिल्हा आपत्ती सौम्यीकरण प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन सल्लागार डॉ.प्रशांत वाघमारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरसिंह रावळ, चंद्रकांत गवळी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, 15 व्या वित्त आयोगाद्वारे राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्तीचे सौम्यीकरण करणेसाठी निधी मंजुर केलेला…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी केसीई संस्थेच्या इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विद्यार्थ्यांना इन्होवेशन आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी लागणारी एडव्हॉन्स ट्रेनिंग त्यांना मिळावी, तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे, यासाठी आयएमआर आणि जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (जीतो-जिफ) यांच्यासोबत आज एक करार करण्यात आला. इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲंड रिसर्चच्या संचालिका डॉ. शिल्पा बेंडाळे आणि जीतो इंटरनेशनल इनक्यूबेशन फाउंडेशनचे गव्हर्नर भरत ओसवाल यांच्या स्वाक्षरीने हा करार संपन्न झाला . यावेळी मंचावर इंस्टीट्यूटच्या वतीने डॉ. वर्षा पाठक, डॉ. पराग नारखेडे, प्रा. पुनीत शर्मा तर जीतो-जीफच्या वतीने जीतो जळगाव युवा शाखाचे अध्यक्ष हरक सोनी, सचिन चोरडिया आणि निखील कोठारी…
साईमत, प्रतिनिधी, जळगाव शहरातील बळीरामपेठतील भाजप कार्यालयात महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या उपस्थितीत शहर मतदार चेतना अभियानाच्या प्रमुखासह कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. बळीरामपेठेतील भाजपा कार्यालयात भाजपा महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षेखाली शहर मतदार चेतना अभियानाची बैठक घेण्यात आली. या अभियानाच्या प्रमुखपदी जितेंद्र मराठे, सहसंयोजकपदी महेश कापूरे तर युवा मोर्चा अध्यक्षपदी आनंद सपकाळे यांच्या निवडीची घोषणा कण्यात आली. 26 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत मतदार चेतना अभियान राबविण्यात येणार आहे. यात नवमतदार नोंदणी, विदेशात असलेल्या मतदारांची नोंदणी, मतदार यादी आधारकार्ड जोडणे, दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळणे, याबाबत अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान शहरातील मंडळनिहाय राबविण्यात येणार आहे. त्यामुळे…
साईमत, जळगाव, प्रतिनिधी एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एकाने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी रात्री ११ वाजता एकावर पोक्सो कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत त्याच परिसरात राहणाऱ्या एकाने शुक्रवारी दुपारी ४ वाजता अश्लील चाळे करत विनयभंग केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडित मुलीने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. पीडित मुलीसह तिच्या नातेवाईकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक…