Author: saimat

साईमत न्यूज नेटवर्क – महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर आता नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून आणखी एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह (४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (३०, रा. घणसोली) यांना अटक केली आहे. बलीराम सूर्यनाथ कुशवाह (५०) असे मृत पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बलीराम कुशवाह हे ऐरोलीतील यादवनगर परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. दरम्यान,…

Read More

भक्ती, प्रेम आणि सेवाभावाचा संदेश देणारी जगन्नाथ रथयात्रा भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन साईमत /पाचोरा  /प्रतिनिधी भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेचा आध्यात्मिक संदेश आणि भक्तीमार्गाचे महत्त्व उलगडून सांगणारा साप्ताहिक भगवद्गीता सत्संग येथील श्री श्री इस्कॉन जगन्नाथ मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रविवारी (दि. १२ जुलै) सायंकाळी आयोजित या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत भक्तीभावाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात हरिनाम संकीर्तनाने झाली. महामंत्राच्या गजराने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. यानंतर प्रमुख वक्ते चैतन्य जीवन प्रभुजी यांनी भगवान श्रीजगन्नाथांच्या रथयात्रेचे महत्त्व, श्रीकृष्णभक्तीचा मार्ग आणि भगवद्गीतेतील भक्तियोग या विषयांवर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी प्रभुजी यांनी सांगितले की, भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र आणि माता सुभद्रा हे आपल्या…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर पत्नीने पतीच्या डोक्यात मोबाईल फेकून मारल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच वाद विकोपाला गेला. संतापाच्या भरात पत्नीने हातातील मोबाईल पतीच्या डोक्यात मारल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेत पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या व्यक्तीला कुटुंबीयांनी तातडीने बोलांगीर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दीपके गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांविरोधात सातत्याने आवाज उठवत असून, देशातील विविध शहरांतही त्यांनी आंदोलन छेडले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “मी आज एका महत्त्वाच्या विषयासाठी आलो आहे. जंतरमंतरवर अभिजीत दीपके यांनी उचललेला मुद्दा हा लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले, काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे…

Read More

‘निपुण भारत’ अधिक प्रभावी करण्यासाठी सीईओ करिश्मा नायर यांचा थेट व्हिडिओ संवाद साईमत /जळगाव /प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत सोमवारी डोंगर कठोरे येथील जिल्हा परिषद शाळेतील वर्गाशी थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. निपुण भारत अभियानांतर्गत सुरू असलेल्या अध्यापन प्रक्रियेचा आढावा घेताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेची प्रत्यक्ष पडताळणी केली. तसेच शिक्षकांच्या नियोजनाची माहिती जाणून घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. संवादादरम्यान करिश्मा नायर यांनी शिक्षक राहुल वाणी यांच्याकडून दैनंदिन अध्यापनाचे नियोजन, कृती आराखड्याची अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन कशा पद्धतीने केले जाते, याबाबत…

Read More

एसटीचा तांत्रिक बिघाडामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे हाल  साईमत /भुसावळ /प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेतील तांत्रिक अडचणी आणि देखभालीच्या अभावाचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. फुलगाव उड्डाणपुलाजवळ एकाच ठिकाणी दोन एसटी बसेस अचानक नादुरुस्त झाल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. महामार्गावर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम झाला. एसटी महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात जुन्या बसेस, वारंवार होणारे तांत्रिक बिघाड आणि देखभालीतील त्रुटींमुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे अलीकडेच एसटीच्या तिकिट दरात वाढ करण्यात आली असतानाही सेवेच्या गुणवत्तेत अपेक्षित सुधारणा…

Read More

चोरी, घरफोडी, फसवणूक व सायबर गुन्ह्यांतील जप्त मालमत्ता न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सुपूर्द उत्कृष्ट तपास करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलीस दलाने मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या तपासात उल्लेखनीय यश संपादन करत तब्बल २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मूळ मालकांच्या ताब्यात दिला. चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमधून हस्तगत करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू नागरिकांना परत मिळाल्याने पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ११ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ‘मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे’ अंतर्गत हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला…

Read More

दूध फेडरेशन रोडवर इलेक्ट्रिकल्स दुकानाला अचानक आग साहित्य जळून खाक अग्निशमन दलाच्या धावपळीने टळला अनर्थ साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सोपाननगर, दूध फेडरेशन रोडवरील दिनेश इलेक्ट्रिकल्स या दुकानाला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. दुकानात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिकल साहित्य असल्याने आग वाढण्याची शक्यता होती; मात्र अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी पोहोचून केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत दुकानातील साहित्य जळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाची तत्काळ धाव मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे ८.५० वाजता प्राची तायडे यांनी जळगाव…

Read More

पहाटेच्या सापळ्यात एमडी तस्कर दोघे अटकेत, ५६.२९ ग्रॅम ड्रग्ज जप्त साईमत /जळगाव /प्रतिनिधी शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हापेठ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत एमडी (मेफेड्रोन) विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून ५६.२९ ग्रॅम एमडीसह तीन लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. शहरात अमली पदार्थांची विक्री आणि तरुणांना व्यसनाच्या आहारी नेणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानाच्या माध्यमातून अमली पदार्थ तस्करांविरोधात कठोर भूमिका…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – जर तुम्ही नियमितपणे रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक प्रवासी RailOne App वरून बुक केलेल्या अनारक्षित तिकिटाचा स्क्रीनशॉट काढून किंवा WhatsApp वर आलेली प्रत दाखवून प्रवास करतात. मात्र, भारतीय रेल्वेने अशा तिकिटांसंदर्भात महत्त्वाचा नियम स्पष्ट केला आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, RailOne App वरून बुक केलेले अनारक्षित (Unreserved) तिकीट केवळ ज्या नोंदणीकृत मोबाईल आणि मोबाईल क्रमांकावरून ते बुक करण्यात आले आहे, त्याच डिव्हाइसवर वैध मानले जाईल. याचा अर्थ, तिकीट WhatsApp द्वारे दुसऱ्या मोबाईलवर पाठवणे, त्याचा स्क्रीनशॉट दाखवणे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शेअर केलेली प्रत सादर करणे वैध मानले जाणार नाही. रेल्वे प्रशासनाने…

Read More