महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार२० जुलैला होणार थेट सुनावणी साईमत /जळगाव /प्रतिनिधी महिलांच्या समस्या, तक्रारी आणि अडचणींचे प्रभावी निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या उपक्रमात महिलांना आपल्या विविध समस्या थेट प्रशासनासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे. कौटुंबिक वाद, सामाजिक अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, अन्याय-अत्याचाराच्या तक्रारी तसेच विविध प्रशासकीय प्रश्नांवर महिलांना योग्य मार्गदर्शन आणि मदत मिळावी, या उद्देशाने शासनाच्या निर्देशानुसार दर महिन्याला महिला लोकशाही दिन आयोजित केला जातो. महिलांना आपल्या तक्रारींसाठी वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागू नयेत, यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून…
Author: saimat
बिनविरोध निवड; ग.स. पतपेढीला मिळाले नवे नेतृत्व साईमत /जळगाव /प्रतिनिधी सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी (ग.स. सोसायटी)च्या नेतृत्व निवडीचा निर्णय अखेर झाला असून, अध्यक्षपदाची जबाबदारी रागिणी चव्हाण यांच्याकडे तर उपाध्यक्षपदाची धुरा अनिल गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याने पतपेढीच्या संचालक मंडळात एकमताचे चित्र पाहायला मिळाले. ग.स. सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अजबसिंग पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे नवीन अध्यक्षाच्या निवडीबाबत सभासद आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर बुधवारी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत या रिक्त पदाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी उमेदवार निश्चित करताना सहकार गट आणि लोकसहकार गटाने…
मातंग समाजाच्या महिलेच्या तक्रारीवरून पोलिस प्रशासनाविरोधात संताप साईमत /मलकापूर /प्रतिनिधी उमाळी (ता. मलकापूर) येथील अनुसूचित जातीतील एका महिलेवर व तिच्या कुटुंबीयांवर कथित अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांनी तक्रार योग्य पद्धतीने नोंदवून घेतली नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार, ९ जुलै रोजी उमाळी येथे अनुसूचित जातीतील एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना काही व्यक्तींनी जातीवाचक शिवीगाळ, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या तसेच महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पीडित महिला, तिची आई, कुटुंबातील इतर महिला आणि अल्पवयीन मुलींनी…
२८ वर्षीय तरुणाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, परिसरात हळहळ साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील राममंदिर परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणाने बुधवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुण काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.निवृत्ती गोकुळ बोबडे (वय २८, रा. राममंदिर परिसर, शिरसोली प्र.न., ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कुटुंबीयांच्या निदर्शनास प्रकार आल्यानंतर तातडीने स्थानिक प्रशासनाला…
मदिना नगरचा हक्काचा मार्ग अडवला ४८ तासांत कारवाईची नागरिकांची मागणी साईमत /सावदा /प्रतिनिधी शहरातील मदिना नगर परिसरातील सार्वजनिक रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गट क्रमांक १२३१ मधून जाणारा नागरिकांच्या वापरातील रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याचा आरोप करत परिसरातील नागरिकांनी सावदा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे. बंद झालेला मार्ग तातडीने खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी करण्यात आली असून, प्रशासनाला ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. मदिना नगर परिसरातील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित रस्ता महसूल अभिलेखातील ७/१२ उताऱ्यावर तसेच अधिकृत नकाशावर सार्वजनिक वापराचा मार्ग म्हणून नमूद आहे. मात्र, गट क्रमांक १२३१ मधील काही भागावर अतिक्रमण झाल्याने…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतला आढावा २५ जुलैपर्यंत शंभर टक्के प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य साईमत /जळगाव (पाळधी) /प्रतिनिधी मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेला पाळधी परिसरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पात्र मतदारांची नोंदणी, माहितीची पडताळणी आणि आवश्यक दुरुस्तीची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पाळधी खुर्द आणि पाळधी बुद्रुक येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिबिरांना भेट देऊन प्रशासनाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. यावेळी…
हम को मिटा सके ये जमाने में दम नहीं हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं सुरेश उज्जैनवाल ….बरं झालं माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी स्वतःच भाजपमध्ये परत जाण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे जाहीर करून विरोधकांना त्यांचे कडवट शब्दरूपी हल्ले तूर्त तरी म्यान करण्यास भाग पाडले आहे. पण असे असले तरी पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणे तितकेसे सोपे नसते, अशी वक्तव्ये करणाऱ्यांना कदाचित माहीत नसावे की, नवीन पिक्चर केव्हाही सुरू करता येतो फक्त स्टोरी , पार्श्वभूमी दमदार हवी, आणि हेही शाश्वत सत्य आहे की प्रत्येकाचा पिक्चर कधी ना कधी संपतोच…! हल्ली राजकीय क्षेत्रात एकमेकाला विशेषतः कट्टर विरोधकास नामोहरम करण्याची…
‘बालविवाह करणार नाही, होऊ देणार नाही’; विद्यार्थ्यांनी घेतली सामाजिक जबाबदारीची प्रतिज्ञा साईमत /जळगाव /प्रतिनिधी बालविवाह ही सामाजिक समस्या दूर करण्यासाठी कायद्याची माहिती आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची असून, याच उद्देशाने प्रविण पाटील फाऊंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बालविवाह प्रतिबंधक कायद्यावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी तसेच बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रवीण पाटील यांनी सांगितले की, मुलीचे विवाहाचे कायदेशीर किमान वय १८ वर्षे, तर मुलाचे २१ वर्षे आहे. या वयापूर्वी विवाह करणे, लावणे किंवा त्यासाठी मदत करणे हा कायद्याने गंभीर गुन्हा आहे. बालविवाहामुळे मुलांचे शिक्षण अपूर्ण राहते, त्यांच्या…
मनपाचा दणका जळगावातील १२ व्यावसायिकांवर कारवाई, १० हजारांचा दंड साईमत /जळगाव /प्रतिनिधी शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमणांच्या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पुन्हा एकदा कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी सकाळी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत जुन्या सानेगुरुजी रुग्णालय परिसर आणि जुन्या कापड बाजारातील मसाला गल्ली भागात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या १२ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संबंधितांकडून १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या जागेवर व्यवसाय उभारल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वारंवार प्राप्त होत होत्या. विशेषतः जुन्या सानेगुरुजी रुग्णालयासमोरील भागात फुले, पान आदी वस्तू विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमुळे…
आईच्या तक्रारीनंतर तपासाला नवे वळण पती व सासू पोलिसांच्या ताब्यात साईमत /यावल /प्रतिनिधी यावल तालुक्यातील किनगाव परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेली विहिरीत पडण्याची घटना पोलिस तपासात धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. सुरुवातीला अपघात मानल्या गेलेल्या या प्रकरणात आता साडेतीन वर्षीय दृष्टिहीन बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा तसेच त्याच्या आईच्या जीवितालाही धोका निर्माण केल्याचा आरोप समोर आला आहे. जखमी महिलेने दिलेल्या जबाबानंतर पोलिसांनी तिच्या पतीसह सासूविरुद्ध खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. १३ जुलै रोजी सकाळच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती पाटील आणि त्यांचा लहान मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती यांना गंभीर दुखापत झाली, तर कृष्णाचा पाण्यात…