Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»Jalgaon : जळगाव महापालिकेत आनंदोत्सव; स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर जल्लोष
    जळगाव

    Jalgaon : जळगाव महापालिकेत आनंदोत्सव; स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर जल्लोष

    saimatBy saimatApril 15, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव मनपात ७ नव्या स्वीकृत नगरसेवकांची एन्ट्री

    साईमत जळगाव  प्रतिनिधी

    गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव शहर महानगरपालिकेतील ७ स्वीकृत नगरसेवक पदांचा राजकीय पेच अखेर सुटला असून, बुधवारी (दि. १५ एप्रिल) झालेल्या विशेष महासभेत सर्वपक्षीय उमेदवारांची एकमताने निवड करण्यात आली. या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय वातावरणात सुरू असलेली अनिश्चितता संपुष्टात आली आहे.

    महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष महासभेत भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निवड प्रक्रियेत कोणताही विरोध नोंदवला न जाता सर्व सदस्यांची सहमतीने निवड झाल्याने ही सभा विशेष ठरली.

    नवीन नियुक्तीनुसार भारतीय जनता पक्षाकडून डॉ. राधेश्याम चौधरी, रमेश मतानी, प्रदीप रोटे आणि सुभाष शौचे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेना (शिंदे गट)कडून हर्षल मावळे आणि नरेंद्र आत्माराम पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तसेच शिवसेना (ठाकरे गट)कडून महानगरप्रमुख शरद तायडे यांची निवड करण्यात आली आहे.

    महासभेनंतर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. निवडीचा निर्णय जाहीर होताच महापालिका इमारतीच्या परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ उत्साहात दुमदुमून गेला.

    या निवडीमुळे जळगाव महापालिकेतील एकूण नगरसेवकांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. नव्या समीकरणानुसार भारतीय जनता पक्षाची ताकद ४६ वरून ५० झाली आहे. शिवसेना (शिंदे गट)ची संख्या २५ वर स्थिरावली असून, शिवसेना (ठाकरे गट)ची संख्या ७ वर पोहोचली आहे. या बदलामुळे महापालिकेतील सत्तासंतुलन अधिक स्पष्ट झाले असून आगामी काळातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    महापालिकेतील या महत्त्वपूर्ण निवडीनंतर आता प्रशासनिक आणि विकासकामांच्या गतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    मोठी कारवाई! स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, युपीची अट्टल ATM चोर टोळी जेरबंद

    April 15, 2026

    Jalgaon : जळगावात महामार्ग अतिक्रमणांवर महापालिकेचा मोठा ‘हातोडा’ अजिंठा चौकातील भंगार बाजार हटवण्याचा निर्णय

    April 15, 2026

    Jalgaon : जळगावातील ४८ शिक्षण अधिकाऱ्यांना एसआयटीच्या नोटिसा

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.