प्लास्टिक डेपो जळून खाक, परिसरात भीतीचे वातावरण साईमत भडगाव प्रतिनिधी : शहरातील मिनी एमआयडीसी परिसरात आज दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडाली. प्लास्टिक साठवणूक असलेल्या डेपोला लागलेल्या या आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करत संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरवले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारच्या वेळी मिनी एमआयडीसी परिसरातून अचानक धूर उठताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. काही वेळातच आगीच्या मोठ्या ज्वाळा आकाशापर्यंत उसळू लागल्या. प्लास्टिक साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्याने आग झपाट्याने पसरली आणि काही मिनिटांतच संपूर्ण डेपो आगीच्या विळख्यात सापडला. जळणाऱ्या प्लास्टिकमुळे निर्माण झालेला दाट आणि विषारी धूर परिसरात पसरल्याने नागरिकांना श्वास घेण्यास…
Author: saimat
साईमत / वृत्तसंस्था मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) नौदलाने होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्गक्रमण करत असलेल्या दोन तेल जहाजांना परत माघारी जाण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती आयआरजीसीशी संलग्न तस्नीम वृत्तसंस्थेने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (१९ एप्रिल) बोत्सवाना आणि अंगोला या देशांचे झेंडे असलेली दोन तेलवाहू जहाजे होर्मुझ सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र इराणच्या नौदलाने हस्तक्षेप करत या जहाजांना पुढे जाण्यास स्पष्ट मनाई केली आणि त्यांना परत फिरण्याचे आदेश दिले. आदेशानुसार दोन्ही जहाजे माघारी वळल्याचे वृत्त आहे. दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीच्या नियंत्रणावरून सुरू असलेल्या तणावामुळे परिस्थिती अधिकच…
साईमत / उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पित्यानेच आपल्या दोन अल्पवयीन जुळ्या मुलींची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना नौबस्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये रविवारी पहाटे सुमारे ४:३० वाजता घडली. आरोपी पित्याने आपल्या ११ वर्षांच्या जुळ्या मुलींचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती यूपी-112 वरून पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घरात प्रवेश करताच दोन्ही मुलींचे रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह पाहून सर्वजण हादरून…
तडीपार गुन्हेगारांवर पोलिसांचा कडक वॉच; रात्री होणार अचानक तपासणी साईमत भुसावळ प्रतिनिधी : शहरातून हद्दपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भुसावळ पोलिसांनी आता विशेष आणि कडक मोहीम हाती घेतली आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून काही गुन्हेगार पुन्हा शहरात प्रवेश करत असल्याच्या संशयाच्या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना या संदर्भात विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. रात्रीच्या गस्तीदरम्यान तडीपार करण्यात आलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊन ते शहरात उपस्थित आहेत का, याची प्रत्यक्ष…
साईमत / नागपूर नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील गांधीनगर भाजी मंडी परिसरात सकाळच्या सुमारास घडलेल्या गॅस सिलिंडर स्फोटाच्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे (वय 40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे दहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पानतावणे यांच्या पत्नी स्वयंपाकघरात चहा तयार करत असताना अचानक गॅस गळती झाली. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि त्यानंतर गॅस सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेत घरातील सर्व साहित्य—जीवनावश्यक वस्तू, कपडे, टीव्ही, फ्रीज तसेच सोन्याचे दागिने—जळून खाक झाले असून सुमारे पाच लाख रुपयांचे आर्थिक…
आखाजी सणाची धूम; खापरावरच्या पुरणपोळ्यांना विशेष मागणी साईमत जळगाव प्रतिनिधी : खानदेशातील पारंपरिक आणि श्रद्धेशी जोडलेला अक्षय तृतीया अर्थात ‘आखाजी’ सण यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत असून जळगाव शहरात खापरावर भाजलेल्या पुरणपोळ्यांना प्रचंड मागणी दिसून येत आहे. शहरातील विविध भागांत सकाळपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. खानदेशात अक्षय तृतीया हा सण ‘आखाजी’ म्हणून ओळखला जातो. या दिवशी खापरावर भाजलेल्या पारंपरिक पुरणपोळ्या आणि आंब्याच्या रसाचा नैवेद्य पूर्वजांना अर्पण करण्याची प्रथा आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात असून आजही ती तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने पाळली जाते. यंदाच्या आखाजीनिमित्तही नागरिकांनी पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या खापरावरच्या पुरणपोळ्यांना विशेष पसंती दिली आहे.…
दैवी उपचाराच्या नावाखाली फसवणूक; संगमनेरमधील भोंदूबाबाला अटक साईमत / संगमनेर संगमनेर तालुक्यात “माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करतो” असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला पोलिसांनी गजाआड केले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अंधश्रद्धा आणि फसवणुकीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील राजेंद्र बापू गडगे उर्फ भोंदू महाराज याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि मधुकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तक्रारीनुसार, आरोपीने “कॅन्सर बरा करणे, मूल नसलेल्या…
साईमत / पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड शहरात भ्रष्टाचाराच्या आरोपांना वाचा फोडणाऱ्या तक्रारदारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात तीव्र खळबळ उडाली आहे. तसेच स्थानिक राजकीय वर्तुळातही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सांगवी ते बोपोडी परिसराला जोडणाऱ्या सुमारे 32 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाच्या तसेच त्याच्या सुशोभीकरणासाठी झालेल्या अंदाजे 19 कोटी रुपयांच्या खर्चावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत सांगवी परिसरातील ‘काँग्रेच्युलेशन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रारदार दिलीप मारुतीराव तनपुरे यांनी आक्षेप नोंदवत संबंधितांकडून स्पष्टीकरण मागितले होते. याच वादातून राग धरून काही जणांनी तनपुरे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शुक्रवारी…
संतापाचा उद्रेक; दोषींना अटक करण्याची जोरदार मागणी साईमत जळगाव प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील आमोदा येथे आदिवासी टोकरे कोळी समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या मूर्तीची समाजकंटकांकडून विटंबना झाल्याच्या संतप्त निषेधार्थ आज जळगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. शिवतीर्थावरून मोर्चाची सुरुवात या निषेध मोर्चाला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (शिवतीर्थ मैदान) येथून सुरुवात झाली. शेकडोच्या संख्येने जमलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजबांधवांनी हातात निषेधाचे फलक घेत “दोषींना अटक करा”, “आमच्या श्रद्धेचा अपमान सहन केला जाणार नाही” अशा जोरदार घोषणा देत…
साईमत / मेहकर समृद्धी महामार्गावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि मोबाईलवर रील बनवण्याच्या व्यसनामुळे एका खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दीड वर्षाच्या लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ घडली. नेमकी घटना काय घडली : मुंबईहून पुसदकडे निघालेली खासगी ट्रॅव्हल्स बस समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असताना मेहकर टोल नाक्याजवळ आली. याचवेळी बसमधील चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण…