Author: saimat

“जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही.” साईमत जळगाव प्रतिनिधी :राज्यातील सरकारी, निम-सरकारी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी अखेर तीव्र पवित्रा घेत मंगळवार, २१ एप्रिलपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अक्षरशः विस्कळीत झाली आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्याजिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकत्र येत जोरदार निदर्शने केली. घोषणाबाजी, फलकबाजी आणि एकजुटीच्या जोरावर कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष…

Read More

रायगडच्या लोणेरेमध्ये तरुणीची निर्घृण हत्या; लॉजमधील खोलीत निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह, काही तासांत आरोपीला अटक साईमत / रायगड रायगड जिल्ह्यातील लोणेरे परिसरात रविवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका लॉजच्या खोलीत २४ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून, तिची धारदार शस्त्राने डोक्यावर आणि शरीरावर वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे असून ती रायगडच्या वडगाव परिसरातील रहिवासी होती. लॉजमधील खोलीत तिचा मृतदेह आढळताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ रायगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणाच्या तपासासाठी फिंगरप्रिंट तज्ज्ञ, फॉरेन्सिक पथक आणि…

Read More

अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग; रहदारीला अडथळा ठरणारे अनधिकृत व्यवसाय जमीनदोस्त साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी जळगाव महापालिकेने सुरू केलेल्या धडक मोहिमेने आज मंगळवारी (दि. २१ एप्रिल) पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठा बदल घडवून आणला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आकाशवाणी चौक आणि प्रभात चौक परिसरात दाखल झाले आणि अनधिकृत हातगाड्या व टपऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिनधास्तपणे थाटलेल्या हॉकर्सच्या गाड्या आणि टपऱ्यांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत होता. परिणामी नागरिकांना सतत कोंडीचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका…

Read More

विदर्भात उन्हाचा तडाखा तर खान्देश-मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी; आयएमडीकडून अनेक भागांना सतर्कतेचा इशारा साईमत / मुंबई राज्यात सध्या उन्हाळा आणि पावसाचा अनोखा संगम पाहायला मिळत असून हवामानात मोठे बदल नोंदवले जात आहेत. एका बाजूला विदर्भात कडाक्याचे ऊन नागरिकांना हैराण करत असताना, दुसरीकडे खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरींची हजेरी लागत आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, २० ते २४ एप्रिल दरम्यान राज्यातील विविध भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागांमध्ये विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात…

Read More

साईमत / जळगाव सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने बाजारात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र सोन्याच्या सातत्याने वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे. सोन्याचा दर प्रति तोळा दीड लाख रुपयांच्या पुढे पोहोचल्याने खरेदीदारांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक ग्राहक सध्या खरेदी टाळून बाजारातील परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असले तरी आज मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही. दर स्थिर राहिल्याने ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी उच्च किमतीमुळे खरेदीवर मर्यादा येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात आज मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे.…

Read More

सुदैवाने जीवितहानी टळली, आकाशवाणी चौकात क्षणभर तणाव साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आकाशवाणी चौकात मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने कारला दिलेल्या जोरदार धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास आकाशवाणी चौकातून वेगाने जात असलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या कारला अचानक जोराची धडक दिली. धडकेचा आवाज आणि तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अपघातानंतर ट्रक चालक आणि कार चालक यांच्यात रस्त्याच्या मधोमधच शाब्दिक वाद झाला. त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले…

Read More

साईमत / जळगाव महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तब्बल २२ वर्षांनंतर निवासस्थानाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक प्रशस्त आणि आधुनिक सोयींनी युक्त निवासस्थान उपलब्ध होणार आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या निवासस्थानांसाठीचे नियम अद्ययावत करताना बदललेले राहणीमान, वाढत्या गरजा आणि आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानाचा विचार करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार घरांच्या क्षेत्रफळात १०० ते ७०० चौरस फूटांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा विषय गांभीर्याने घेत समितीची स्थापना केली होती. या समितीने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा आधार घेत…

Read More

उजव्या कालव्याजवळ आढळला गळा चिरलेला मृतदेह साईमत चोपडा प्रतिनिधी : शहरातील नारायण नगर परिसरालगत असलेल्या हातनूरच्या उजव्या कालव्याजवळ आज सकाळी एका युवकाचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप राजू माळी  असे मृत युवकाचे नाव असून, त्याची निर्घृण हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आज सकाळी स्थानिक नागरिकांना कालव्याच्या काठावर संशयास्पद अवस्थेत एक मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेहाची स्थिती पाहता हा खून अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून…

Read More

 शुद्ध पाण्यासाठी जळगाव महापालिकेत ‘ऑन-ग्राउंड अ‍ॅक्शन’ची नवी दिशा साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरात पावसाळ्यापूर्व स्वच्छता अभियानाला गती देत महापौर दीपमाला काळे यांनी प्रत्यक्ष कृतीतून प्रशासनाला नवा संदेश दिला आहे. भाऊंच्या उद्यान परिसरातील महाकाय जलकुंभाची पाहणी करताना त्यांनी थेट टाकीत उतरून स्वच्छता कामांचा सखोल आढावा घेतला. या अनोख्या आणि धाडसी पाहणीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. शहरवासीयांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने महानगरपालिकेकडून जलकुंभ स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत भाऊंच्या उद्यानातील सुमारे १०० फूट उंच आणि २८ लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात साचलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे. कामाची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी महापौर काळे यांनी निसरड्या शिडीवरून टाकीत उतरून…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन; २४ तासांत अटक न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली असून, सोमवार, २० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करून निवेदन सादर करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, दि. ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता रिंगरोड परिसरात मुकुंद सपकाळे हे त्यांच्या वाहनाने जात असताना ५ ते ६ मोटारसायकलस्वारांनी त्यांचे वाहन अडवले. आरोपींनी वाहनाला चारही बाजूंनी घेराव घालून दगडफेक…

Read More