Author: saimat

अतिवेग, ओव्हरलोड आणि टायर फुटल्याने अपघात; केंद्राकडून मदत जाहीर साईमत / जम्मू-काश्मीर जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात आज (दि. २०) सकाळी भीषण बस अपघात घडला. रामनगरहून कगोतच्या दिशेने जाणारी बस रस्त्यावरून सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळून उलटली. या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला असून २९ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि ती अतिवेगात होती. कगोत नाल्याजवळ अचानक बसचे टायर फुटले, त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघातात बसचा वरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. जखमी प्रवाशांवर उधमपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी…

Read More

आरा टेकड्यांमध्ये धडकेनंतर आगीचे लोळ; प्रवाशांची संख्या अद्याप अस्पष्ट साईमत / छत्तीसगड जशपूर जिल्ह्यातील आरा टेकड्यांमध्ये एक खासगी विमान कोसळल्याची भीषण घटना घडली आहे. हे विमान डोंगराला धडकल्याने मोठी दुर्घटना झाली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जशपूरच्या नारायणपूर भागातील रतनपहळी जंगल परिसरात हे चार्टर्ड विमान झाडांना धडकले आणि त्यानंतर थेट डोंगरावर कोसळले. अपघातानंतर मोठा आवाज झाला असून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट हवेत दिसत होते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेनंतर घटनास्थळी धूर आणि आगीचे दृश्य स्पष्ट दिसत होते. विमानात किती प्रवासी होते किंवा कोण होते याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि…

Read More

परस्पर तळ, बंदरे व हवाई तळांच्या वापराला मंजुरी; संयुक्त सराव व प्रशिक्षणालाही गती मिळणार साईमत / नवी दिल्ली भारत आणि रशिया यांच्यातील नवीन संरक्षण कराराची अधिकृत अंमलबजावणी सुरू झाली असून, दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याला यामुळे नवे परिमाण मिळाले आहे. या करारानुसार आता भारत आणि रशिया एकमेकांच्या भूमीवर मर्यादित संख्येने सैनिक, युद्धनौका आणि लष्करी विमाने तैनात करू शकतील. या कराराअंतर्गत दोन्ही देशांना एकमेकांच्या देशात एका वेळी जास्तीत जास्त ३,००० सैनिक, ५ युद्धनौका आणि १० लष्करी विमाने तैनात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा करार दोन्ही देशांच्या दीर्घकालीन मैत्रीला अधिक बळकटी देणारा ठरणार आहे. रशियाच्या अधिकृत माहितीनुसार, या…

Read More

मध्य प्रदेशातील मौगंजमध्ये दुर्घटना; वेगावर नियंत्रण सुटल्याने दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी साईमत / मध्य प्रदेशा मध्य प्रदेशातील मौगंज जिल्ह्यात सोशल मीडियासाठी रील बनवण्याच्या नादात झालेल्या धोकादायक प्रकारामुळे भीषण अपघात घडला आहे. नॅशनल हायवेवर वेगाने दुचाकी चालवत आणि धोकादायक स्टंट करत असताना तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील तरुणांचा वेग नियंत्रणाबाहेर गेला. रस्त्याच्या कडेला विटांनी भरलेला ट्रेलर उभा होता. वेग अधिक असल्याने दुचाकी थेट ट्रेलरला जाऊन धडकली. या अपघातात तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. याच वेळी दुसऱ्या दुचाकीवर असलेले प्रशांत द्विवेदी आणि प्रदीप द्विवेदी हे दोन भाऊदेखील त्याच ट्रेलरला धडकले. या…

Read More

आरोग्य, शिक्षण व ग्रामविकास विभागांचा सखोल आढावा; त्रुटींवर तातडीच्या सुधारणा आदेश साईमत /जळगाव /कानळदा/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत शासकीय यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या या धडक पाहणीमुळे स्थानिक प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून विविध विभागांची प्रत्यक्ष कामकाज तपासणी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, संस्था आणि विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाचा आढावा घेण्याचा धडाका सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी कानळदा येथे अचानक भेट देत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास…

Read More

परतवाडा परिसरात संतापजनक प्रकार; सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांची जलद कारवाई साईमत / अमरावती अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात ६५ वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणाने संबंधित वृद्ध महिलेला “रुग्णालयात सोडतो” असे सांगून दुचाकीवर बसवले. त्यानंतर रस्त्यातील पुलाखाली संधी साधून त्याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पीडित महिलेने धाडस दाखवत शिरसगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. अत्यंत…

Read More

पोलीस ठाण्यात कोयत्याचा धुडगूस; अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण अटकेत साईमत एरंडोल प्रतिनिधी : एरंडोल येथे पोलीस ठाण्यात घडलेल्या एका थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आपल्या ओळखीच्या संशयितांना अटक का करण्यात आली नाही, या कारणावरून संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट पोलीस ठाण्यात घुसून हातात कोयता घेत गोंधळ घालत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एरंडोल पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना समाधान राधो अहिरे (वय ३२, रा. केवडपुरा, एरंडोल) हा तरुण…

Read More

 नशिराबाद पोलिसांची धडाकेबाज कारवाई साईमत नशिराबाद  प्रतिनिधी : बसस्थानक परिसरात हातात गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नशिराबाद पोलिसांनी रविवारी (दि. १९ एप्रिल) सायंकाळी सुमारे ६ वाजता मोठ्या शिताफीने अटक केली. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३६, रा. नशिराबाद) असे आहे. मिळालेल्या माहितीनंतर तात्काळ कारवाई नशिराबाद बसस्थानक परिसरात एक इसम गावठी पिस्तूल घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करत असल्याची माहिती नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ हालचाल करत पोलीस उपनिरीक्षक हरीष पाटील…

Read More

रुक्मिणी नगर ते वाघ नगर पट्ट्यात संध्याकाळनंतर असुरक्षिततेचे सावट; नागरिकांची कडक कारवाईची मागणी साईमत जळगाव प्रतिनिधी : शहरातील वाघ नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखोरांचा वाढता धिंगाणा नागरिकांसाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः संध्याकाळनंतर या भागात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असून रुक्मिणी नगर ते वाघ नगर या दरम्यान राहणाऱ्या नागरिकांना, व्यावसायिकांना तसेच महिला व मुलींना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गिरणा पंपिंग रस्त्यावरील श्री साई डेअरीजवळ सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत काही टवाळखोर तरुणांचा अड्डा तयार होत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी मोठमोठ्याने गोंधळ घालणे, दुचाकी रस्त्यावर उभ्या करून वाहतुकीत अडथळा निर्माण करणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन…

Read More

साईमत / विरुधुनगर तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनारपट्टी परिसरात असलेल्या एका फटाका निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, अजूनही अनेक कामगार मलब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोट इतका तीव्र होता की काही क्षणांतच आगीने शेजारील चार फटाका युनिट्सनाही वेढले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्फोटाच्या धक्क्याने आसपासच्या इमारतींचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, मलबा हटवण्याचे आणि बचावकार्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परिसराला…

Read More