घंटागाडी कामगारांसह कर्मचाऱ्यांचा सन्मान साईमत/ जळगाव / प्रतिनिधी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी पहाटेपासून अविरत मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांच्या योगदानाची दखल घेत कामगार दिनानिमित्त प्रभाग क्रमांक १६ मध्ये त्यांच्या सन्मानाचा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला. समाजातील अत्यंत महत्त्वाचा, परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या घटकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम ठरला. नगरसेविका तथा प्रभाग समिती सदस्या वंदना संतोष इंगळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमात प्रभागातील सफाई कर्मचारी व घंटागाडी कामगार अशा सुमारे ५० कामगारांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, चटई तसेच नाश्ता व चहा देऊन सन्मान करण्यात आला. स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता शहराची स्वच्छता राखणाऱ्या या कर्मचाऱ्यांप्रती उपस्थितांनी मनःपूर्वक आदर व्यक्त केला. अयोध्यानगर येथील…
Author: saimat
४ मे रोजी होणाऱ्या सभेत ४७८ दिव्यांगांना अर्थसहाय्य, निधीवाढीसह पायाभूत सुविधांवर महत्त्वाचे निर्णय अपेक्षित साईमत/ जळगाव / प्रतिनिधी जळगाव शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा येत्या सोमवार, दि. ४ मे रोजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. शहरातील प्रलंबित विकासकामे, सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय निर्णय यावर या सभेत सखोल चर्चा होणार आहे. या बैठकीत विशेषतः दिव्यांग बांधवांच्या कल्याणाचा मुद्दा अग्रक्रमाने घेण्यात आला आहे. शहरातील प्रलंबित ४७८ दिव्यांग अर्जदारांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या दिव्यांगांसाठी असलेली दीड कोटी रुपयांची वार्षिक…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम साईमत/ जळगाव / प्रतिनिधी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या दुहेरी औचित्य साधत जळगावात शिवसेनेतर्फे कष्टकरी कामगारांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे जितेंद्र गवळी यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाने श्रमिकांविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. शहरातील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयात १ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कामगारांचा विशेष गौरव करण्यात आला. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता समाजव्यवस्थेचा कणा म्हणून कार्य करणाऱ्या श्रमिकांना यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला. उपस्थित कामगारांना शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून…
चार सिलिंडर स्फोटांनी परिसर हादरला, अग्निशमन दलाची मोठी धावपळ साईमत/ जळगाव / प्रतिनिधी शहरातील एमआयडीसी परिसरात आज सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. ‘जे’ सेक्टरमधील एका चटई उत्पादन करणाऱ्या कंपनीला अचानक आग लागली असून काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले. आगीच्या उंच ज्वाळा आणि काळ्या धुराचे लोट दूरवरूनही स्पष्ट दिसत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतील ज्वालाग्राही साहित्यामुळे आग अतिशय वेगाने पसरली. परिस्थिती आणखी गंभीर झाली तेव्हा कंपनीत ठेवलेल्या गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक तब्बल चार मोठे स्फोट झाले. या स्फोटांच्या जोरदार आवाजाने संपूर्ण एमआयडीसी परिसर हादरून गेला असून नागरिक आणि…
२७ वर्षीय तरुण ठार एक जखमी घातपाताचा संशय, तपासाला वेग साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जळगाव शहरातील कानळदा रोडवरील समर्थ लॉन परिसरात मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात एका २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी हा केवळ अपघात नसून घातपात असण्याची शक्यता व्यक्त केल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय संजय देशमुख (वय २७, रा. कांचन नगर, जळगाव) असे असून, गणेश पवार असे जखमी तरुणाचे नाव आहे. गणेश पवार याच्यावर सध्या शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हळदीच्या कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासात अपघात मिळालेल्या…
१० लाखांचे नुकसान, गायींच्या अन्नटंचाईचे संकट साईमत/ नशिराबाद/ प्रतिनिधी नशिराबाद परिसरातील बेळी गावाजवळील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथे असलेल्या सदगुरू झेंडूजी महाराज बेळीकर संस्थानच्या अखत्यारीतील भगवान श्रीकुंडलेश्वर गोशाळेत शुक्रवारी दुपारी अचानक भीषण आग लागून मोठे आर्थिक व व्यवस्थापकीय नुकसान झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. दुपारी साधारण दीड वाजण्याच्या सुमारास चाऱ्याच्या साठवणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या गोडाऊनमधून अचानक धूर येऊ लागला. काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण करत संपूर्ण गोदामाला आपल्या विळख्यात घेतले. उन्हाचा कडाका आणि वाढलेले तापमान यामुळे आग अधिक वेगाने पसरल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत हजारो क्विंटल चारा जळून पूर्णपणे खाक झाला…
धार्मिक यात्रेत चोपड्याच्या महिलेचा मृत्यू, शहरात हळहळ साईमत/ चोपडा/ प्रतिनिधी श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक समाधानाच्या शोधात निघालेल्या चारधाम यात्रेत चोपडा येथील ५९ वर्षीय प्रतिभा नारायण बोरोले यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यात्रेच्या अंतिम टप्प्यावर असताना अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे चोपडा शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चोपड्यातील पंकज नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रतिभा बोरोले या १६ भाविकांच्या गटासह चारधाम यात्रेसाठी रवाना झाल्या होत्या. त्यांनी यात्रेदरम्यान यमुनोत्री, गंगोत्री आणि केदारनाथ या पवित्र स्थळांचे दर्शन घेत विधिवत पूजा-अर्चा केली होती. यात्रेच्या…
साईमत / आंतरराष्ट्रीय “वादळ येतंय, आणि ते कुणीही रोखू शकणार नाही,” अशा शब्दांत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी हा संदेश त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केल्यानंतर जगभरात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या विधानाचा नेमका अर्थ काय, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले तरी, अमेरिका–इराण तणावाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. अलीकडच्या काळात इराण आणि अमेरिकेतील संबंध पुन्हा तणावपूर्ण झाले असून, दोन्ही देशांमध्ये अणुकार्यक्रम, लष्करी हालचाली आणि व्यापारी मार्गांवरून वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या विधानाने संभाव्य लष्करी कारवाई किंवा मोठ्या राजकीय निर्णयाचे संकेत दिले जात असल्याची चर्चा…
साईमत / जयपूर राजस्थानातील भिवानी परिसरातील साथलका गावातील बिल्लू कॉलनीमध्ये आज सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात सकाळी जेवण बनवण्याची तयारी सुरू असताना गॅस सिलेंडरमधून गळती होत होती. दरम्यान, गॅस पेटवण्यासाठी माचिस लावताच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घराचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत रामसिंग, ममता, भुवेश, पंकज, छगन, काजल आणि किशनवती हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर सर्व…
साईमत / पुणे मावळ तालुक्यातील पवनानगर परिसरात एका तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह दुचाकीसह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा छडा लावत पुणे ग्रामीण पोलीस यांनी अवघ्या तीन ते चार तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. अमोल अनंता मोहोळ (वय ३३, रा. वारू) असे मृत तरुणाचे नाव असून भरत काशिनाथ वाल्हेकर आणि सुनील भिमा पवार (दोघेही रा. पवनानगर, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश…