उष्णतेत नागरिकांना मोठा दिलासा
साईमत/जळगाव/ प्रतिनिधी :
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज पांडे चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. शहरात वाढलेल्या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थंड व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने आणि संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, तसेच ना.मा श्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
सध्या शहरात वाढत्या उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. ही पाणपोई शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर कायमस्वरूपी स्वरूपात कार्यरत राहणार असून, दररोज प्रवाशांना, नागरिकांना व बाजारपेठेत येणाऱ्या लोकांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा, महानगर प्रमुख संतोषभाऊ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर संपर्क प्रमुख तसेच युवासेना पदाधिकारी जितेंद्र गवळी, महानगर समन्वयक राहुल नेतलेकर यांच्यासह सोहम विसपुते, दिपक पाटील, विशाल निकम, दिपक माळी, शुभम गवळी, सचिन सोनार, राहुल सांगिले, चेतन परदेशी, क्रिश सनकत, विजय वाघ, शंतनू नारखेडे, यश कोल्हे, मानस तळले आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र गवळी मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
