साईमत न्यूज नेटवर्क –
सराफा बाजार आज उघडताच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. लग्नसराई किंवा गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल मानला जात आहे. गुड रिटर्न्सनुसार २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा दर ₹१,५६,११० इतका असून त्यात ₹११० ची घसरण नोंदवली गेली आहे. तर दुसरीकडे चांदीचे दर स्थिर आहेत.
तज्ज्ञांच्या मते, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांवर होत असून त्यामुळे किंमतीत चढ-उतार दिसत आहेत.
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१५,६११, ८ ग्रॅमसाठी ₹१,२४,८८८, तर १०० ग्रॅमसाठी ₹१५,६१,१०० इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१४,३१० असून १० ग्रॅमसाठी ₹१,४३,१०० इतका आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹११,७०८ असून १० ग्रॅमसाठी ₹१,१७,०८० इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा दर ₹१५,६११ प्रति ग्रॅम, २२ कॅरेट ₹१४,३१० प्रति ग्रॅम आणि १८ कॅरेट ₹११,७०८ प्रति ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. दिल्लीत मात्र २४ कॅरेट सोन्याचा दर थोडा जास्त म्हणजे ₹१५,६२६ प्रति ग्रॅम इतका आहे.
दर घटल्यामुळे सध्या सोन्याची खरेदी आणि गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा योग्य काळ असल्याचे बाजारातील जाणकारांचे मत आहे.
