Author: saimat

जळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांमधील गैरव्यवहार, भ्रष्टाचारी कारभार आणि स्थानिक प्रशासनाच्या मनमानीविरोधात कैलास नरसिंग पारधी यांनी ‘बेमुदत आमरण उपोषणाचा’ पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना दिलेल्या निवेदनानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने, अखेर पारधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा ‘दुर्दैवी निर्णय’ घेतला असल्याचे जाहीर केले आहे.या निवेदनात एकूण १६ गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवत प्रशासकीय यंत्रणेला धारेवर धरण्यात आले आहे. ​ बोगस डॉक्टरांवर कारवाई व आरोग्य विभागाची चौकशी ​जिल्ह्यातील बोगस ‘बंगाली वैद्य’ (डॉक्टर्स) यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच आरोग्य विभागातील दोषींवर निलंबनाची (Dismissal) कारवाई करून अमलनेर, यावल, भुसावळ, बोदवड येथील पूर्ण…

Read More

चोपडा नाका चौकात रेती डंपरची भीषण धडक; मुलगी थोडक्यात बचावली, नागरिकांचा संताप उसळला साईमत/अमळनेर  / प्रतिनिधी अमळनेर शहरातील चोपडा नाका चौकात आज दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली. ओव्हरलोड रेती वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने रस्ता ओलांडणाऱ्या हर्षदा नावाच्या मुलीला जोरदार धडक दिली. या अपघातात ती डंपरच्या पुढील चाकाजवळ अडकली, मात्र प्रसंगावधान आणि नागरिकांच्या तत्काळ मदतीमुळे तिचा जीव वाचला. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षदा ही आपल्या वडिलांना डबा देण्यासाठी जात असताना चोपडा नाका चौकात ही दुर्घटना घडली. अचानक आलेल्या रेती डंपरने तिला धडक दिल्याने काही क्षणातच परिसरात गोंधळ निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन धाडसाने बचावकार्य सुरू करत तिला चाकाखालून बाहेर काढले.…

Read More

 लाखोंचे साहित्य जळून खाक, मोठा अनर्थ टळला साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जळगाव येथील औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) एल सेक्टरमध्ये सोमवारी दुपारी एका कुलर निर्मिती करणाऱ्या कारखान्यात अचानक भीषण आग लागून मोठी खळबळ उडाली. या आगीत कारखान्यातील कच्चा माल, तयार कुलर आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून, लाखोंचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कुलर निर्मिती करणाऱ्या कंपनीत कामकाज सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले. त्यातून उडालेल्या ठिणगीमुळे कारखान्यात आग लागली. कुलर निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुके गवत (पॅड), प्लास्टिकचे भाग आणि अन्य ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे उंच लोळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी : ​”जितके डावलतील, तितके ते लोकांच्या मनात शिरतील”; नवी मुंबईतील फलक वादावरून मुख्यमंत्र्यांची पाठराखण ​विदर्भातील शेतकरी आत्महत्येवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घरचा आहेर; कर्जमाफीवरून दिला कडक इशारा “प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात ही भावना असणे स्वाभाविक आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की ‘देवाभाऊंचे’ (देवेंद्र फडणवीस) दिल्लीत प्रमोशन व्हावे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीच धुरा सांभाळावी,” असे अत्यंत स्फोटक आणि सूचक वक्तव्य शिवसेना (शिंदे गट) समर्थक आमदार बच्चू कडू यांनी केले आहे. सत्तेत सहभागी असूनही बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा भाजप आणि उपमुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ​भंडारा येथे…

Read More

​राष्ट्रवादीने डावलल्यामुळे ज्येष्ठ नेते भुजबळ कमालीचे नाराज; राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील ‘अन्याया’वर बोट ​”इतरांना जो न्याय मिळतो, तो मलाही मिळावा हीच अपेक्षा होती”; अजित पवार गटातील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर “मी नाराज नाही, नाराज होऊन काय होणार? पण पक्षातील इतरांना जो न्याय मिळाला तोच न्याय मलासुद्धा मिळाला पाहिजे, ही माझी रास्त मागणी होती. शेवटी काय, ‘मै कबड्डी का खिलाडी हू, शतरंज का खिलाडी नही हू’…” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर आपली खदखद जाहीरपणे व्यक्त केली आहे. ​राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक असताना त्यांना डावलून प्रफुल पटेल यांचे अत्यंत विश्वासू…

Read More

​सुनसगाव शिवारातील सुदर्शन पेपर मिलसमोरील घटना : मध्यरात्री झोपेत असताना काळाचा घाला; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना भुसावळ तालुक्यातील सुनसगाव शिवारामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. सुदर्शन पेपर मिलसमोर उघड्यावर झोपलेल्या एका ३८ वर्षीय मजुराच्या अंगावर रेतीने भरलेला डंपर रिव्हर्स घेताना गेल्याने त्याचा जागीच चिरडून मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला कोणतीही मदत न करता चालक डंपरसह घटनास्थळावरून फरार झाला असून, या अमानुष प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ​राजाभैय्या नत्तू (वय ३८, मूळ रा. धरदुवा, उत्तर प्रदेश) असे मृत दुर्दैवी मजुराचे नाव आहे. ते सध्या सुनसगाव येथील सुदर्शन पेपर मिल परिसरात वास्तव्यास होते.…

Read More

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपात आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि ‘बीव्हीजी’ची संयुक्त बैठक; ‘ऑन फिल्ड’ उतरण्याचे आदेश साईमत/जळगाव/ प्रतिनिधी पावसाळ्याच्या तोंडावर जळगाव शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण होऊ नये आणि नाले-गटारी तुंबून नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. सोमवारी (८ जून) मनपामध्ये आरोग्य विभाग, मलेरिया विभाग आणि स्वच्छता कंत्राटदार ‘बिव्हिजी’ कंपनीची संयुक्त तातडीची बैठक महापौरांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. “शहराच्या आरोग्याशी खेळणारा कोणीही असो, त्याची गय केली जाणार नाही. नियम मोडणाऱ्यांवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करा,” असे कडक आदेश महापौरांनी या बैठकीत दिले. ​बैठकीत बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “नागरिक किंवा व्यावसायिक…

Read More

महानगरपालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन : ऐन उन्हाळ्यात महिलांना घ्यावा लागतोय खासगी टँकरचा आसरा; १५ दिवसांत तोडगा न निघल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा जळगाव महानगरपालिका हद्दीतील वाघ नगर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. शहराच्या इतर भागांत दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना, वाघ नगरकरांना मात्र तब्बल १० ते १२ दिवसांनंतर पाणी मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा महानगर अध्यक्ष मनोज अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पुढील १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल, तसेच मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण केले जाईल, असा…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – दिल्ली : देशातील शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून दरवर्षी लाखो पदवीधर बेरोजगार राहात असल्याचा गंभीर आरोप करत ‘कॉकरोच जनता पार्टी (CJP)’ या डिजिटल चळवळीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाला केवळ सुरुवात मानत आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, “दरवर्षी देशात सुमारे ५० लाख तरुण पदवीधर होतात, मात्र त्यापैकी सुमारे २० लाखांनाच नोकऱ्या मिळतात. उर्वरित लाखो तरुण बेरोजगार राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण आणि रोजगाराऐवजी राजकारण धर्माच्या आधारावर चालले आहे, ज्याचा थेट परिणाम तरुणांच्या भविष्यावर होत आहे.” पेपर…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – शहरातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे शनिवारी (दि. ६) दोन गंभीर दुर्घटना घडल्या. या घटनांमध्ये विजेचा धक्का लागून एका लाइनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. या दोन्ही घटनांमुळे खासगी वीज वितरण कंपनी एमपीएसएलच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नुमानीनगर गल्ली क्र. ४ येथील रहिवासी मोहम्मद इब्राहिम मोहम्मद युसूफ अन्सारी उर्फ गड्डू वायरमन (वय ३२) हे शनिवारी दुपारी १ च्या सुमारास संगमेश्वर परिसरातील कब्रस्तानात वीज मीटर बदलण्यासाठी गेले होते. मीटर बदलल्यानंतर वीजजोडणी करण्यासाठी ते खांबावर चढण्याच्या तयारीत असताना मीटर पेटीत अजूनही विद्युतप्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.…

Read More