महायुतीतील मतभेद मिटले; जळगावात बंडखोरीवर पडदा पडणार साईमत /जळगाव/प्रतिनिधी जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसमोर उभे ठाकलेले बंडखोरीचे संकट अखेर निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (शिंदे गट) समर्थित बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांच्या उमेदवारी माघारीबाबत महायुतीतील वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकमधील पेचप्रसंग सोडवल्यानंतर आता जळगावचाही तिढा सुटल्याचा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा शनिवारी मंत्री गुलाबराव पाटील करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जळगावमधील राजकीय पेचप्रसंगावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, रेश्मा काळे…
Author: saimat
साईमत न्यूज नेटवर्क – ओमान किनारा ते होर्मुझ सामुद्रधुनीदरम्यानचा समुद्री पट्टा सध्या गंभीर तणावाच्या स्थितीत आहे. गेल्या तीन दिवसांत भारतीय नाविक असलेल्या तीन व्यापारी जहाजांवर हल्ल्याच्या घटना घडल्याचा दावा समोर आला आहे. या घटनांमुळे भारतीय नाविकांच्या सुरक्षिततेबरोबरच देशाच्या ऊर्जा पुरवठा साखळीवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वप्रथम ८ जून रोजी MT Marivex या टँकरवर कारवाई करण्यात आली. या जहाजावर २४ भारतीय नाविक होते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे जहाज इराणकडे जात असल्याच्या संशयावरून थांबवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व नाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर ९ आणि १० जूनच्या दरम्यान MT Setebello या दुसऱ्या जहाजावर हल्ला…
साईमत न्यूज नेटवर्क – वसई : एकीकडे जगभरात फुटबॉल वर्ल्डकपचा उत्साह सुरू असताना, दुसरीकडे मुंबईलगतच्या वसईमध्ये फुटबॉल जगताला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुटबॉल क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवण्याचे खोटे आमिष दाखवून एका ३६ वर्षीय खाजगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन खेळाडूवर वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी प्रशिक्षकाला अटक केली आहे. अभिजित मेंडल (वय ३६, रा. वसई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो वसई परिसरात स्वतःचे खाजगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवतो. विश्वासाला तडा आणि ब्लॅकमेलिंगचा डाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये फुटबॉलचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याच्या…
साईमत न्यूज नेटवर्क – कर्नाटकमध्ये एका ३६ वर्षीय कपड्याच्या व्यापाऱ्याने अत्यंत टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे व्यापाऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये थेट राज्य सरकारच्या मोफत बस प्रवास योजनेचा उल्लेख करत तिच्यावर आर्थिक नुकसानीचे खापर फोडल्याचे समोर आले आहे. मृतांमध्ये प्रभाकर (६५), त्यांची पत्नी ज्योती (५५) आणि मुलगा संतोष (२८) यांचा समावेश आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, प्रभाकर हे कपड्याचे व्यवसाय करत होते. मागील काही वर्षांपासून त्यांना व्यवसायात सातत्याने तोटा सहन करावा लागत होता. त्यात वाढत्या कर्जामुळे आर्थिक ताण अधिकच वाढला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, ज्योती…
शस्त्रसाठा जप्त, फरार व तडीपार आरोपींवर मोठी कारवाई साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी शहर व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसविण्यासाठी भुसावळ पोलिसांनी मंगळवारी पहाटे व्यापक कोबिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारांविरोधात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईत बेकायदेशीर शस्त्रे, चोरीची दुचाकी आणि अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला असून तडीपार व फरार आरोपींसह अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली १० जून रोजी पहाटे ५ ते सकाळी ८ या वेळेत भुसावळ उपविभागात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये एकाचवेळी पोलिसांची पथके तैनात करण्यात आल्याने…
साईमत न्यूज नेटवर्क – नीट परीक्षा, शैक्षणिक व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांवरून चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने पुन्हा एकदा मोठी घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांनी 20 जून रोजी दिल्लीत मोठे आंदोलन आयोजित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे 6 जून रोजी झालेल्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर पुढील आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना दीपके म्हणाले की, सध्या पुण्यातही आंदोलन सुरू असून त्यामध्ये पुणे विद्यापीठातील विद्यार्थी तसेच एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणारे अनेक तरुण सहभागी झाले आहेत. दीपके यांनी सांगितले की, ही चळवळ सुरुवातीला केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित असल्याची टीका…
‘सर्जिकल स्ट्राईक’ने हादरले अवैध धंदे; सट्टा व दारूचे अड्डे जमीनदोस्त साईमत/जळगाव/ प्रतिनिधी शहरातील अवैध धंद्यांविरोधात जळगाव पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत एकाच दिवशी सहा ठिकाणी छापेमारी केली. सट्टा-जुगार आणि गावठी दारूच्या अड्ड्यांवर टाकलेल्या या धाडसत्रात एकूण ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. अत्यंत गोपनीय पद्धतीने नियोजन करून या…
साईमत न्यूज नेटवर्क – नाशिक : शहरासाठी प्रस्तावित टायरबेस्ड मेट्रो निओ प्रकल्प आता मागे पडण्याच्या स्थितीत असून, त्याऐवजी Mumbai Metro, Pune आणि Nagpur येथील धर्तीवर नियमित मेट्रो प्रकल्प राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता प्रतितास प्रवासी क्षमता आवश्यक निकष पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे अवर सचिव अजयसिंह पाटील यांनी मंत्रालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक बोलावली असून, नियमित मेट्रो प्रकल्पाच्या शक्यतांवर सविस्तर चर्चा होणार आहे. संबंधित विभागांना याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार Urban Mass Transit Company यांनी २०१६ मध्ये नाशिक शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार…
साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्ली : महिलांना धूरमुक्त स्वयंपाकघर उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उज्ज्वला गॅस योजनेतील अनुदानाच्या नियमांमध्ये बदल झाल्याने लाखो लाभार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी वर्षाला नऊ सिलिंडरवर मिळणारे अनुदान आता केवळ चार सिलिंडरपुरते मर्यादित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नव्या व्यवस्थेनुसार उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना वर्षातील पहिल्या चार सिलिंडरवर प्रत्येकी ३०० रुपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना हे सिलिंडर सवलतीच्या दरात उपलब्ध होतील. मात्र त्यानंतर लागणाऱ्या अतिरिक्त सिलिंडरसाठी संपूर्ण बाजारभाव मोजावा लागणार आहे. देशभरात वाढती महागाई, घरगुती खर्चातील वाढ आणि इंधनाच्या किंमतींचा परिणाम आधीच सर्वसामान्य कुटुंबांवर होत असताना या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांवर अधिक…
साईमत न्यूज नेटवर्क – जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील खोटेनगर परिसरातील अपघातानंतर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीने घेतलेल्या निर्णयांचे अभिलेख, ठरावांच्या अंमलबजावणीचे अहवाल आणि अनुपालन नोंदीच संबंधित विभागांकडे उपलब्ध नसल्याचा धक्कादायक खुलासा माहिती अधिकारातून समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदार कंपनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, परिवहन विभागाचे अधिकारी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मयुरेश निंभोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, हा विषय केवळ एका अपघातापुरता मर्यादित नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी, सार्वजनिक अभिलेखांचे जतन, प्रशासकीय उत्तरदायित्व आणि नागरिकांच्या जीवनाच्या मूलभूत अधिकाराशी थेट निगडित आहे. खोटेनगर अपघाताचा संदर्भ २८ ऑगस्ट २०२४…