छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटखा माफियांची दहशत आणि मुजोरी अत्यंत टोकाला पोहोचली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पथकावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माफियांच्या गुंडांनी थेट कारवाई करणाऱ्या महिला अन्न सुरक्षा अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि पोलीस प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (९ जून) पहाटे वाळूज परिसरातील रहीमपूर येथे सापळा रचला होता. गोपनीय माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी एका आयशर ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता,…
Author: saimat
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठे वादळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलून पक्षाने राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे भुजबळ समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी लावलेल्या एका विशिष्ट बॅनरमुळे राजकीय वर्तुळात थेट ‘बंडाचे’ संकेत मिळत असून, भुजबळ आता कोणता मोठा निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘साहेब हीच वेळ योग्य निर्णय घेण्याची…’ समर्थकांचे थेट आवाहन नाशिक शहरात छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी लावलेले फलक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फलकांवर “साहेब हीच वेळ…
काठमांडू: नेपाळमध्ये उत्तर प्रदेशातील दोन भारतीय नागरिकांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि गुन्हा ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे. या दोन्ही तरुणांना तब्बल २७.८ लाख रुपये (भारतीय चलन) किमतीच्या ४५,००० केळ्यांची तस्करी (Bananas Smuggling) करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या अजब तस्करीमुळे नेपाळ पोलीस आणि सीमा शुल्क विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या लुंबिनी प्रांतातील बर्दिया जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका संशयास्पद गोदामावर अचानक छापा टाकला. या छाप्यादरम्यान गोदामात हजारो डझन कच्ची केळी साठवून ठेवल्याचे उघडकीस आले. कोणतीही परवानगी किंवा सीमा शुल्क (Custom Duty) न भरता ही केळी…
“व्यंगातून उभा राहिलेला ‘कॉक्रोच जनता पार्टी’चा धमाका! सोशल मीडियापासून थेट जंतर-मंतरपर्यंत चर्चा!” साईमत न्यूज नेटवर्क – सामान्य नागरिक आणि तरुणांमध्ये राजकारणाविषयी वाढत चाललेला अविश्वास लक्षात घेता व्यंगातून जन्माला आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या ऑनलाईन चळवळीने देशभरात लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर सुरुवातीला विडंबन म्हणून सुरू झालेल्या या उपक्रमाला कोट्यवधी लोकांनी पाठिंबा दिल्यानंतर ही चळवळ आता केवळ डिजिटलपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष रस्त्यावरही उतरली आहे. ६ जून रोजी संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनातून या चळवळीने आपली ऑफलाईन उपस्थितीही दाखवून दिली. या वाढत्या लोकप्रियतेची दखल आता राजकीय वर्तुळातही घेतली जात असून इंडिया आघाडीच्या सोमवारी (८ जून)…
खगोलप्रेमींसाठी आजची (९ जून) संध्याकाळ अत्यंत खास आणि अविस्मरणीय असणार आहे. सूर्यमालेतील दोन सर्वात तेजस्वी आणि बलाढ्य ग्रह, म्हणजेच ‘शुक्र’ (Venus) आणि ‘गुरु’ (Jupiter) आज एकमेकांच्या अत्यंत जवळ येणार आहेत. खगोलशास्त्रामध्ये या विहंगम दृश्याला ‘ग्रहांची युती’ (Conjunction) असे म्हटले जाते. ही अपूर्व खगोलीय घटना आज संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात उघड्या डोळ्यांनी सहज पाहता येणार आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ‘नॅशनल जिओग्राफिक’ (National Geographic) संस्थेने आपल्या विज्ञान वृत्तात या अद्भुत घटनेचे ‘कॉस्मिक किस’ (Cosmic Kiss) असे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. वेळ आणि दिशा: कधी व कुठे पाहाल? पश्चिम आकाशात सूर्यास्तानंतर लगेचच, म्हणजेच संध्याकाळी ७:३० ते रात्री ८:३० या वेळेत हे विहंगम…
साईमत न्यूज नेटवर्क – जयपूरच्या खोह नागोरियान परिसरात मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजता फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका अल्पवयीन मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रहीम, 15 वर्षीय रुबिन आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश असून त्यांना तातडीने जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील सूत्रांनुसार, अनेक जखमी 90 टक्क्यांहून अधिक भाजलेले आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जयपूरचे जिल्हाधिकारी संदेश नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोह नागोरियान येथील आयशा नगर तलाई परिसरात,…
ना जास्त गरम, ना पूर्ण चार्जिंग; तरीही २ वर्षे जुन्या ‘व्हिवो’ (Vivo) स्मार्टफोनचा अचानक स्फोट जोधपूर येथील मंडोर कृषी मंडी परिसरात एका किराणा व्यापाऱ्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक बॉम्बसारखा फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भीषण स्फोटानंतर मोबाईलला लागलेल्या आगीत व्यापाऱ्याच्या गुडघ्याच्या वरचा (मांडीचा) भाग आणि हाताची बोटे गंभीररीत्या भाजली असून त्वचेचे पापुद्रे निघाले आहेत. या अनपेक्षित घटनेमुळे संपूर्ण परिसरात आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोपाल सोनी (वय ३९, रा. लाल सागर परिसर) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या किराणा व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. …अन् जणू विजेचा…
८ राज्यांतील २०० हून अधिक शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; १६३ कृषी बिझनेस प्लॅनचे सादरीकरण जळगाव प्रतिनिधी | भविष्यातील कृषी क्षेत्राला नवे तंत्रज्ञान आणि सक्षम नेतृत्व देण्यासाठी सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या राष्ट्रीय स्तरावरील महा-अधिवेशनाचा ८ जून रोजी जैन हिल्स येथे उत्साहात समारोप झाला. १ ते ८ जून दरम्यान तीन वेगवेगळ्या टप्प्यांत पार पडलेल्या या अधिवेशनात देशभरातील विद्यार्थ्यांनी १६३ कृषी इन्व्होशन आणि १६३ कृषी बिझनेस प्लॅन्स सादर करून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या तिसऱ्या सत्रात कृषी बिझनेस प्लॅनमध्ये जळगावच्या ‘अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल’ने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर कृषी इन्व्होशन प्रकारात कोल्हापूरच्या सीताबाई पटवर्धन…
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने यावर्षी जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही समाविष्ट करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जून 2026 मध्ये मंजूर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात येणार असून, राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सुमारे 36,585 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून विविध कारणांमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही नव्या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या अतिरिक्त लाभार्थ्यांसाठी सरकारने तब्बल 14 हजार कोटी रुपयांची…
जळगाव शहरातील शामनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या 64 वर्षीय वृद्धाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत वृद्धाची ओळख जीवन पाथरे उर्फ जीवन मिस्त्री (वय 64) अशी झाली आहे. प्राथमिक तपासात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोन संशयितांनी जीवन मिस्त्री यांच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपींनी बेदम मारहाण करून त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अमानुष…