Author: saimat

साईमत न्यूज नेटवर्क – नायजेरियातील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर झामफारा राज्यात पुन्हा एकदा भीषण हल्ल्याची घटना समोर आली आहे. झामफारा राज्यातील मराडून भागातील गोरॉन नामाये गावात अज्ञात हल्लेखोरांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात १७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास शेतकरी आपल्या शेतात नियमित काम करत असताना मोटारसायकलींवरून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला. अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मराडून स्थानिक प्रशासनाचे अध्यक्ष सुनासी दोसारा यांनी सुरक्षा दलांना जंगल परिसरातील…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक सिद्धनाथांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना म्हसवड–पंढरपूर मार्गावरील तांदळवाडी गावाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो थेट विहिरीत कोसळला. अपघात इतका भीषण होता की अनेक प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेतील मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात कार्यरत असलेल्या एका प्राथमिक शिक्षकाने पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी घडली असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षक तळोदा तालुक्यात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. शाळांना सुट्टी असल्याने ते पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी आले होते. याच दरम्यान कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक संशयानुसार आईस्क्रीममधून विष दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर पत्नी आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षकानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.…

Read More

जावयावर तीक्ष्ण हत्याराने वार, महिलांना मारहाण; बंदुकीची धमकी देत कुटुंबात दहशत साईमत /जामनेर / प्रतिनिधी  तालुक्यातील खादगाव येथे कौटुंबिक वादातून घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विवाहितेचे तिच्याच माहेरच्या लोकांनी ‘स्कॉर्पिओ’ वाहनातून अपहरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, सोडवासोडव करणाऱ्या जावयावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. तसेच कुटुंबातील महिलांना मारहाण करून बंदुकीने ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांसह चार जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खादगाव येथील रहिवासी शुभम ज्ञानेश्वर सोनवणे (वय २९, व्यवसाय – मजुरी) यांचा विवाह पायल…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – नवी दिल्लीतील दक्षिण-पूर्व भागातील तुघलकाबाद एक्स्टेंशन परिसरात आज पहाटे भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्राथमिक तपासानुसार, इमारतीच्या तळमजल्यावर झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच ठिकाणी चार्जिंगला ठेवलेली ई-स्कूटर असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री सुमारे २.२४ वाजता घडली. तुघलकाबाद एक्स्टेंशनमधील पाच मजली इमारतीला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरातील अरुंद रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. या दुर्घटनेत २८…

Read More

गिरणा नदीत २००० क्युसेक्सने पाणी सोडणार; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना साईमत/जळगाव/प्रतिनिधी  गिरणा मोठा प्रकल्पातून बिगर सिंचन पाणी वापरासाठी पाचवे आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १३ जुन २०२६ रोजी सकाळी ६ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदीकाठावरील गावांतील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) धुळे अंतर्गत चाळीसगाव एमआयडीसी, भडगाव नगरपरिषद आणि पाचोरा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी गिरणा नदीपात्रात हे पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जळगाव आणि गिरणा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार हे आवर्तन राबवले जात आहे. गिरणा धरणातून २००० क्युसेक्स (५६.६० क्युबिक मीटर प्रति सेकंद) या क्षमतेने पाणी…

Read More

रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुसावळ–दादर एक्स्प्रेस २१ डब्यांची साईमत/जळगाव/प्रतिनिधी उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून भुसावळ–दादर मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांची रचना वाढवून आता १९ ऐवजी २१ डब्यांसह गाड्या धावणार आहेत. वाढत्या प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भुसावळ, जळगावसह संपूर्ण खान्देशातून मुंबईकडे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. रोजगार, शिक्षण, व्यवसाय तसेच मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या प्रवाशांची या मार्गावर सातत्याने गर्दी असते. त्यामुळे विशेषतः सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात आरक्षण मिळणे कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक ०९०४९ दादर–भुसावळ विशेष…

Read More

साईमत न्यूज नेटवर्क – बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन पोलीस अधिकाऱ्यांसह एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. भरधाव वेगाने जाणारी कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेमुळे हा अपघात झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना साहेबपूर कमल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बख्दा परिसरात राष्ट्रीय महामार्ग-३१ जवळ घडली. मृतांमध्ये रतवारा पोलीस ठाण्याचे प्रभारी साजन पासवान, बेल्लारी पोलीस ठाण्याचे प्रभारी नीरज कुमार, अरार पोलीस ठाण्याचे प्रभारी ज्ञानेंद्र अमरेंद्र तसेच खासगी वाहन चालक ज्योतीश कुमार यांचा समावेश आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोलीस अधिकारी गुरुवारी रात्री उशिरा पाटण्यात एक…

Read More

पदभार स्वीकारताच आदित्य जीवने यांनी घेतला विकासकामांचा आढावा साईमत /जळगाव/ प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल झाला असून युवा आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. निवर्तमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. जळगाव शहराच्या वाढत्या नागरी विस्तारासह विविध विकासकामांची जबाबदारी आता नव्या आयुक्तांच्या खांद्यावर आली आहे. शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त आदित्य जीवने यांनी महापालिकेच्या प्रमुख विभागांचा प्राथमिक आढावा घेतला. शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, पाणीपुरवठा…

Read More

दोन तासांत पोलिसांचा दणका; लूट करणारे चार जेरबंद साईमत/जळगाव/ प्रतिनिधी चाकूचा धाक दाखवत एका युवकाला मारहाण करून रोख रक्कम व दुचाकी लुटणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांना जळगाव तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली रोख रक्कम तसेच फिर्यादीच्या मालकीची दुचाकी जप्त केली असून या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास चेतन प्रकाश पाटील (रा. खोटेनगर, जळगाव) हे आपल्या साथीदारांसह पाळधी रोडने प्रवास करत होते. यावेळी साई गार्डन व हॉटेल राधिका परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर चार जणांनी त्यांना अडवले. आरोपींनी चाकूचा धाक दाखवत…

Read More