साईमत न्यूज नेटवर्क –
अमरावती : समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वे तालुक्यातील टोलनाक्याजवळ कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलीचा समावेश असून हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
