Author: saimat

जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल साईमत/ जळगाव /प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे महागडे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव) आणि मयूर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) हे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक आवारात असतांना अज्ञात चोरट्यांनी दोघांचे महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला.…

Read More

पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून…

Read More

ग्रा.पं.जवळच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दूषित ; प्रशासनाचे दुर्लक्ष साईमत/ जळगाव /प्रतिनिधी : शहरालगत तथा पुनर्वसित रायपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळच तुंबलेल्या गटारीतील घाण पाणी थेट पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रायपूर हे शहरालगतचे पहिले गाव असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली भेट याच गावातून होते. मात्र, वार्ड क्र.१ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या १५० ते २०० फूट अंतरावरील गटारींची भीषण दुरवस्था झाली आहे. याठिकाणी घाण पाणी साचून राहते. तसेच मोकाट डुक्करे फिरताना दिसतात. याच ठिकाणी गटारीच्या घाण पाण्यातून घरगुती नळ कनेक्शन…

Read More

मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल . साईमत/ मलकापूर /प्रतिनिधी : शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आरिफ खान (वय २४, रा. माळीपुरा, मलकापूर) हा सन २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत…

Read More

माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली  साईमत/ जामनेर  /प्रतिनिधी : भारतरत्न तसेच माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचीत लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहिली आणि त्यांना आदरांजली व्यक्त केली. अभिवादन समारंभात शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, तालुकाध्यक्ष मयुर पाटील, कमलाकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुकुंदा सुरवाडे, आतिष झाल्टे, दत्तू जोहरे, श्रीराम महाजन, सुहास पाटील, प्रल्हाद सोनवणे, दीपक महाराज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने…

Read More

जि.प.,पं.स. निवडणुकीत उमेदवारांच्या मतदानात मोठा खड्डा पडणार? साईमत/ यावल  /प्रतिनिधी : तालुक्यातील मारूळ ते न्हावी रस्त्याच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे झाल्यामुळे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवाराच्या मतदानावर विपरीत परिणाम होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. मारूळ ते न्हावी रस्त्याचे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडप्यांचे साम्राज्य पसरले आहे. झुडपांमुळे मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मारूळ ते न्हावी या ४ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असल्यामुळे…

Read More

आठ डंपर जप्त; तहसीलदार व पोलीस यांनी संयुक्तपणे केली कारवाई साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. दि.२४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता कोटेश्वर-जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले आठ डंपर पकडले. जप्त करण्यात आलेल्या रेतीची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मलकापूर तहसीलदार समाधान सोनवणे मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्यासोबत थेट मैदानात उतरून वाळू माफियांवर धडक…

Read More

पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण साईमत/​जळगाव /प्रतिनिधी :  मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७०९.२८० किलोग्रॅम गांजा आज, २४ डिसेंबर रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’ स्थापन करण्यात आली होती. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, सदस्य अपर…

Read More

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव /प्रतिनिधी : शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून तिला ठोस लावून पळून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्या…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’  साईमत/जळगाव /प्रतिनिधी :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आता थेट घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शासकीय कामासाठी प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या किंवा अर्ज प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे हा आहे. ‘ सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत नागरिकांनी https://sewadootjalgaon.in या पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर संबंधित भागातील आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालक (सेवादूत) नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांच्या घरी भेट देऊन…

Read More