साईमत -पाचोरा – प्रतिनिधी | शहरातील जारगाव चौफुली जवळील सारोळा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) एटीएम गॅस कटरच्या साहाय्याने फोडून लाखो रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा डाव पाचोरा पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. पोलिसांची गाडी येताना दिसताच चोरट्यांनी रोकड असलेले मुख्य कॅबिनेट जागेवरच टाकून कारमधून पळ काढला. पोलिसांनी धुळे जिल्ह्यापर्यंत या चोरट्यांचा थरारक पाठलाग केला, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. या कारवाईमुळे एटीएममधील ८ लाख ८९ हजार ७०० रुपयांची रोकड पूर्णपणे सुरक्षित राहिली आहे. आज पहाटे पावणेचार वाजेच्या (३:४५) सुमारास तीन अज्ञात तरुण काळ्या रंगाच्या क्रेटा कारमधून (क्र. MH 49 CS 7028) सारोळा रस्त्यावरील एसबीआयच्या एटीएम केंद्रावर आले. त्यांनी…
Author: Bharati Bharsake
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असले तरी गरिबी आणि वाढत्या महागाईमुळे अनेक पालकांना मुलांचे शालेय साहित्य खरेदी करणे कठीण जात आहे. हीच अडचण ओळखून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) जळगाव जिल्हा शाखा आणि प्रज्ञावंत फाउंडेशन सरसावले आहेत. जिल्ह्यातील पत्रकार पाल्य आणि गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावी, यासाठी या दोन्ही संस्थांच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटपाचा कौतुकास्पद उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग), वह्या, कंपास बॉक्स आणि पेन्सिल किट यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | जळगाव राजकीय व शैक्षणिक वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव बाबुराव देवकर यांची तब्बल ४ कोटी ८५ लाख ३ हजार ५८२ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हे जळगाव येथील ‘श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ’ या नामांकित संस्थेचे मुख्य पदाधिकारी आहेत. या संस्थेअंतर्गत विविध महाविद्यालये व शैक्षणिक संकुले चालवली जातात. तक्रारीनुसार, संशयित आरोपी लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा.…
जळगाव शहरातील नेताजी सुभाषबाबू चौकाने घेतला मोकळा श्वास; महापौरांनी केली पायी पाहणी साईमत -जळगाव- प्रतिनिधी | शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि मुख्य बाजारपेठ परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेने आता कंबर कसली आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाने दोन दिवसांपूर्वीच नेताजी सुभाषचंद्र बोस चौक परिसरातील मोठे अतिक्रमण हटवून या चौकांना मोकळा श्वास करून दिला होता. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी संध्याकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, घाणेकर चौक ते प्रकाश मेडिकल चौकापर्यंतच्या परिसराची पायी चालत पाहणी केली आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात स्थायी समिती सदस्य अरविंद देशमुख, महापालिकेचे उपायुक्त पंकज गोसावी, अतिक्रमण विभागाचे संजय…
साईमत -चाळीसगाव- प्रतिनिधी | चाळीसगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ वेगवेगळ्या मोटारसायकली जप्त केल्या असून दोन मुख्य आरोपींसह एका संशयित इसमाला ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ५ हजार रुपये आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी जेरबंद १४ जून २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना, पथकाला एक गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगाव येथील हनुमानसिंग नगरचा रहिवासी राहुल सुभाष भिसे याने ‘एचएफ डिलक्स’ मोटारसायकल चोरी केल्याचे समोर…
निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पारदर्शकतेवर भर; कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी वेगाने पूर्णत्वाकडे जात आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण यशस्वीपणे पार पडले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या प्रशिक्षण सत्रात मतमोजणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, कार्यपद्धती आणि आवश्यक दक्षता याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यावर विशेष भर देण्यात आला. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात मतमोजणीदरम्यान कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येक टप्प्याची सविस्तर…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीतील (ST) बांधवांचे जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सुलभरीत्या मिळावे, यासाठी कोळी महासंघाने पुन्हा एकदा राज्य शासनाकडे धाव घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्तानुसार तातडीने परिपत्रक काढण्यात यावे, यासाठी कोळी महासंघाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे .राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघाने हे स्मरणपत्र सादर केले असून, शासनाच्या दिरंगाईमुळे समाजात तीव्र नाराजी पसरल्याची भावना यात व्यक्त करण्यात आली आहे . निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे रखडले परिपत्रक; समाजात तीव्र नाराजी पत्रात नमूद केल्यानुसार, २०/१०/२०२३…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत केवळ देशाचा चेहरामोहराच बदलला नाही, तर भारताला आत्मनिर्भरतेच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवले आहे. हा प्रवास केवळ आकडेवारीचा नसून देशातील गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा आहे,” असा ठाम विश्वास केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री नामदार रक्षाताई खडसे यांनी आज येथे व्यक्त केला. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी आणि ऐतिहासिक निर्णयांची माहिती देण्यासाठी जळगावात एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम…
आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सर्व विभागांना तत्पर राहण्याच्या सूचना; नालेसफाई, धोकादायक झाडे व इमारतींचे सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याचे आदेश साईमत/जळगाव/ प्रतिनिधी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराच्या महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी पूर्ण सज्ज राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीत अग्निशमन दल, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग, अतिक्रमण विभाग तसेच चारही प्रभाग समित्यांच्या अधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आणि तत्काळ कार्यवाही करावी, असे महापौरांनी स्पष्ट…
जळगाव, चाळीसगाव व भडगावमधील ५० हून अधिक लिपिक संपात सहभागी; वाहनधारकांची गैरसोय वाढली साईमत/जळगाव/ प्रतिनिधी राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अंतर्गत कार्यरत लिपिक संवर्गातील ५० हून अधिक कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाल्याने परिवहन विभागाच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. जळगाव, चाळीसगाव आणि भडगाव येथील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने नागरिकांना विविध सेवांसाठी प्रतीक्षा करावी लागत असून कार्यालयीन कामकाजाची गती मंदावली आहे. मंगळवारी सकाळपासून आरटीओ कार्यालयातील अनेक सेवा खिडक्या बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहन परवाना नूतनीकरण, वाहन नोंदणी, मालकी हक्क हस्तांतरण, नवीन वाहनांचे रजिस्ट्रेशन तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. अनेकांना आवश्यक…