स्वप्नं अर्धवट सोडून गेला गोलू;रात्रपाळीवरून परतताना काळाचा घाला वरणगाव फॅक्टरीत शोक साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी पुणे–शिक्रापूर मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत राजरत्न उर्फ गोलू आनंद कडू सुरवाडे (वय २४, रा. वरणगाव फॅक्टरी) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचा मित्र गौरव इंगळे गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राजरत्न सुरवाडे आणि गौरव इंगळे हे दोघेही भुसावळ तालुक्यातील वरणगाव फॅक्टरी परिसरातील रहिवासी असून पुणे शहरातील एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. बुधवारी पहाटे सुमारे ४.३० वाजता रात्रपाळीचे काम संपवून ते मोटारसायकलने आपल्या राहत्या खोलीकडे परतत असताना शिक्रापूर परिसरात त्यांच्या दुचाकीचा भीषण…
Author: Bharati Bharsake
नवविवाहित तहसील कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर साईमत/फैजपूर (ता. यावल)/ प्रतिनिधी येथून एक धक्कादायक घटना समोर आली असून तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे शासकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सागर राजेंद्र तेली (वय ३५) हे यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कारकून म्हणून कार्यरत होते. ते फैजपूर येथील सराफ कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. बुधवार, १७ जून रोजी दुपारी सुमारे १२ वाजता त्यांनी आपल्या घरातील छताच्या पंख्याच्या हुकाला सूती दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. घटनेची…
२४ जूनला संत मुक्ताई पालखीचे प्रस्थान ६०० किमीची पंढरपूर वारी सुरू मुक्ताई पालखीचा २८ दिवसांचा भक्तिमय प्रवास सुरू साईमत/ मुक्ताईनगर/ प्रतिनिधी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिरसात न्हाऊ घालणाऱ्या पालखी सोहळ्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यंदाच्या मानाच्या संत मुक्ताई आषाढी वारी पालखीचे प्रस्थान २४ जून रोजी दुपारी १ वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून होणार आहे. हा ऐतिहासिक पालखी सोहळा यंदा ३१८ व्या वर्षात प्रवेश करत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने आषाढी वारी अंतर्गत हजारो वारकरी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणार आहेत. ६०० किलोमीटरचा भक्तिमय प्रवास ‘तापीतीर ते भीमातीर’ या संकल्पनेतून ओळखल्या जाणाऱ्या या पालखी सोहळ्यात…
साईमत -जळगाव- प्रतिनिधी | राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (शिंदे गट) नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत अत्यंत बोचरी टीका केली आहे. …तर आधी पाय पांढऱ्याऐवजी काळा कसा होईल ते पहावं! जळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांना, “हे सर्व संजय राऊत यांच्यामुळे घडत आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले, “मला याबाबत माहिती नाही. मात्र संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे माणूस आहेत. त्यांनी…
रात्रीची घटना, सकाळी उघडकीस कार मालकाला धक्का बंद कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारांना मोकळे रान? नशिराबादमध्ये नागरिक संतप्त साईमत/नशिराबाद/ प्रतिनिधी नशिराबाद शहरात जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका कारची अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री दगड मारून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि बंद पडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. घटनेनुसार, रामचंद्र दिगंबर देशपांडे यांची मारुती सुझुकी ऑल्टो कार जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभी होती. सकाळी ते वाहनाजवळ गेले असता कारची मागील काच पूर्णपणे फुटलेली दिसून आली. परिसरात काचेचे तुकडे विखुरलेले आढळल्याने अज्ञात व्यक्तींनी दगड मारून वाहनाची जाणूनबुजून तोडफोड केल्याचे स्पष्ट झाले. विशेष…
मतदान दिवशी नागरिकांना दिलासा : पर्यायी कार्यालये कार्यरत राहणार साईमत/जळगाव/ प्रतिनिधी जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदान दिवशी नागरिकांना शासकीय कामकाजात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पर्यायी कार्यालयांची व्यवस्था जाहीर केली आहे. मतदानाच्या दिवशी संबंधित भागातील काही कार्यालयांमध्ये निवडणूक प्रक्रियेचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली भारत निवडणूक आयोग यांनी घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 अंतर्गत 18 जून 2026 रोजी जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था लागू केली आहे. प्रशासनाने दिलेल्या…
देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरट्यांचा डल्ला साईमत/भुसावळ / प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील विकास कॉलनी परिसरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद भास्कर भंगाळे (वय ५८, रा. विकास कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) हे आपल्या पत्नीसह पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. ११ जून रोजी रात्री त्यांनी घराला कुलूप लावून प्रवास सुरू केला होता. दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी ते घरी परतल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळले. घरात…
ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात साईमत/मुंबई / प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अंतर्गत घडामोडींना वेग आला असून पक्षातील सहा खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अस्वस्थता वाढली असून आगामी काळात पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर खासदारांची बैठक घेतली होती. या बैठकीला सर्व खासदार उपस्थित राहिले नसल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. पक्षातील काही लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबत त्याचवेळी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मंगळवारी ठाकरे गटातील सहा खासदार दिल्लीत दाखल…
वाद मिटला, पण राग नाही; रात्री घरावर हल्ला करून दहशत 15 ते 20 जणांच्या टोळक्याचा हल्ला; एरंडोलमध्ये खळबळ साईमत/एरंडोल/ प्रतिनिधी शहरातील गांधीपुरा परिसरात किरकोळ वादाचे मंगळवारी रात्री हिंसक रूपांतर झाल्याने एकच खळबळ उडाली. सुमारे 15 ते 20 जणांच्या टोळक्याने एका घरावर हल्ला चढवत दगडफेक, मारहाण आणि तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी 16 संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमराज यशवंत पाटील आणि आरिफ शेख माजीद शेख यांच्यात मंगळवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. शहरातील काही मान्यवरांनी हस्तक्षेप करून हा वाद तात्पुरता मिटविला होता. मात्र, रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास वादाचे…
साईमत -पाचोरा प्रतिनिधी | शहरातील लक्ष्मीआंगन कॉलनी परिसरात ऑनलाईन पार्सल देण्याच्या बहाण्याने घरात घुसून महिलेसह तिच्या लहान मुलांना बनावट पिस्तुलाचा (Air Gun) धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या तीन अट्टल गुन्हेगारांना पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि पाचोरा पथकाने ही कामगिरी केली असून, आरोपींकडून चोरीला गेलेली रोकड आणि गुन्ह्यात वापरलेले बनावट पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गत १२ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कुसुम एकनाथ मोकळे (रा. लक्ष्मीआंगन कॉलनी, पाचोरा) या आपल्या मुलांसह घरात असताना ही घटना घडली होती. चेतन उर्फ जितू भुतेकर व त्याच्या दोन साथीदारांनी “तुमचे अमेझॉनचे पार्सल आले आहे,”…