साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश भामरे यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील परीक्षेची अंतिम यादी जाहीर झालेली आहे. त्यात बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश धर्मराज भामरे यांची नियुक्ती झालेली आहे. गणेश भामरे सध्या बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच बाम्हणे गावातील नागरिकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. तसेच गणेश भामरे मित्रपरिवार व सर्व स्तरातील सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘साईमत’ अमळनेरचे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील, केंद्रप्रमुख भटू पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी येथील गांधी रिसर्च सेंटर जैन व्हॅली येथे यशदा, पुणे अंतर्गत सरपंचांसाठी नुकतेच तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात ४० गावांच्या सरपंचांनी सहभाग घेतला. सरपंचांनी विकास आराखडा लोकसहभागाने तयार करावा आणि काळजीपूर्वक नियोजन करावे, तसेच ग्रामपंचायतीच्या आराखड्यात मनरेगाच्या २६४ कामाची सांगड घालावी, असे यशदाचे राज्य प्रशिक्षक भूषण लाडवंजारी यांनी सांगितले. तसेच जलसमृध्द गाव, जलजीवन मिशन, स्वच्छ व हरित गाव कसे करावे, याविषयी मार्गदर्शन केले. यशदामार्फत २०१३ पासून राज्य प्रशिक्षक म्हणून निवडीपासून भूषण लाडवंजारी यांनी २० हजारापेक्षा जास्त पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना विविध विषयावर प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षण देताना ते केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा फायदा ग्रामीण…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शाहूनगर परिसरातील कथ्थक नृत्यगुरू संजय भिमराव पवार यांना नाशिक येथील राष्ट्रीय ‘कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला आहे. राष्ट्रीय कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान सोहळा येत्या रविवारी, १० सप्टेंबर रोजी नाशिक येथील कालिदास कला मंदिरात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय पवार यांचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संजय पवार यांनी शहरात कथ्थक नृत्य क्षेत्रात पायल संगीत नृत्यालयाची स्थापना करुन गेल्या ४० वर्षांपासून अनेक विद्यार्थी व विद्यार्थिंनी घडविले आहेत. कथ्थक नृत्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कलाकुंज शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.
साईमत, जळगाव : प्रतिनिधी पत्रकारांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेतर्फे प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी,२८ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे. जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जैनवाल, कार्याध्यक्ष डिगंबर महाले, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नवाल, महानगराध्यक्ष राजेश यावलकर, रेडिओ विंगचे अध्यक्ष अमोल देशमुख, ऊर्दू विंगचे अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी, डिजिटल विंगचे अध्यक्ष विजय वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार विजय पाठक यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जनता सहकारी बँक लि. आणि रोटरी जळगाव ईस्ट यांच्यातर्फे देवराई स्मृतीवन, कुंभार खोरे, कोल्हे हिल, सावखेडा जळगाव परिसरात नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सतीश मदाने व रोटरी जळगाव ईस्टचे अध्यक्ष संजय शहा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली. जळगाव जनता सहकारी बँकेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक दायित्वाच्या भावनेने व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिने तसेच जळगाव शहर सुशोभित व्हावे, या अनुषंगाने बँक दरवर्षी जळगाव शहरात वृक्षारोपण करीत असते. यावेळी बँकेच्या संचालिका संध्या देशमुख, बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक सुनील अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी, राजेश महाजन,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा ग्रंथालयाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२२ ला उद्घाटन झाले होते. तेव्हापासून जळगाव जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खूप फायदेशीर ठरत आहे. जिल्हा ग्रंथालय किमान १.५ वर्षापासून सुरू झालेले आहे. परंतु पावसाळा बघता महाबळ रोड पशु वैद्यकीय कार्यालयापासून ते जळगाव जिल्हा ग्रंथालयापर्यंत रस्ता बनविलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी व गारा होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये मोटरसायकल अथवा सायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पशुवैद्यकीय कार्यालय ते जिल्हा ग्रंथालयापर्यंत त्वरित रस्ता करण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. ग्रंथालयाच्या सुंदर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी इंग्रजी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. ही स्पर्धा तिसरी ते पाचवी गटासाठी ठेवण्यात आली होती. स्पर्धा क्विझमास्टर्स, मास्टरमाईंड्स, विकिपीडिया आणि आईन्स्टाईन अशा चार संघात विभागण्यात आली होती. कार्यक्रम प्रमुख समाधान पाटील, प्रमिला भादुपोता होत्या. परीक्षक म्हणून शानबाग विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, प्राचार्य प्रवीण सोनवणे होते. स्पर्धेमध्ये चार मनमोहक फेऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक फेरी भाषा आणि सामान्य ज्ञानाच्या विविध पैलूंना आव्हान देण्यासाठी तयार केली होती. पहिली फेरी सामान्य ज्ञान फेरी समाधान पाटील यांनी आयोजित केली होती.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास अकादमी, पुणे तसेच परिवर्तन संस्था, सातारा आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ ऑगस्ट रोजी विद्यापीठात ‘युवा मानसरंग’ कार्यशाळेचे आयोजन केले होते. कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक आरोग्य विषयक जनजागृती करणे होता. कार्यशाळेत विद्यापीठ परिसरातील ३९ विद्यार्थी, ८ शिक्षक आणि ४ शिक्षकेत्तर कर्मचारी असे ५१ जण सहभागी झाले होते. कार्यशाळे दरम्यान विद्यापीठ परिसरातील विविध प्रशाळेतील विद्यार्थ्यांची ऑनलाईन मानसिक आरोग्य चाचणी घेण्यात आली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे उपस्थित होते. कार्यशाळेत अकादमीमार्फत तोशिता तंडेल, रूपेश तेम्भे उपस्थित होते. कार्यशाळेत…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) इन्क्युबेशन ॲण्ड इनोव्हेशन फाउंडेशन यांच्यातील सामजंस्य करारावर कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने अनेक संस्था समवेत सामजंस्य करार करायला सुरूवात केली आहे. या धोरणात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक असल्यामुळे या करारान्वये विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे. गुरूवारी, २४ ऑगस्ट रोजी विद्यापीठात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय संयोजक भारत ओसवाल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नवउद्योजकांना प्रोत्साहन व स्टार्टअपला सहकार्य करणारे संघटन म्हणून जैन इंटरनॅशनलची ओळख आहे. उद्योजकतेची संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न करारामुळे नवीनता…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माजी मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी ब्रह्माकुमारी विद्यालयात येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सेवाकेंद्राच्या संचालिका, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या मुख्य प्रशासिका दादी प्रकाशमणीजीं यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. दादीजींचे संपूर्ण जगावर प्रेम होते आणि त्यांनी जगभरात शांततेचा संदेश दिला. यासाठी त्यांना १९८७ मध्ये वर्ल्ड पीस ॲम्बेसेडर आणि फाइव्ह पीस ॲम्बेसेडर पुरस्कारही मिळाले. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी जागतिक बंधुता दिन म्हणून साजरी केली जाते. यावेळी प्रा.राजीव शर्मा यांनी सांगितले की, दादीजींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रसन्नता. आयुष्यात कधीच दुःख पाहिले नाही. जेव्हा आपण…