काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये इंग्रजी प्रश्नमंजुषा स्पर्धा

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शुक्रवारी, २५ ऑगस्ट रोजी इंग्रजी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्राचार्य प्रवीण सोनवणे, समन्वयिका स्वाती अहिरराव उपस्थित होत्या. ही स्पर्धा तिसरी ते पाचवी गटासाठी ठेवण्यात आली होती. स्पर्धा क्विझमास्टर्स, मास्टरमाईंड्स, विकिपीडिया आणि आईन्स्टाईन अशा चार संघात विभागण्यात आली होती. कार्यक्रम प्रमुख समाधान पाटील, प्रमिला भादुपोता होत्या. परीक्षक म्हणून शानबाग विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, प्राचार्य प्रवीण सोनवणे होते.

स्पर्धेमध्ये चार मनमोहक फेऱ्यांचा समावेश होता. प्रत्येक फेरी भाषा आणि सामान्य ज्ञानाच्या विविध पैलूंना आव्हान देण्यासाठी तयार केली होती. पहिली फेरी सामान्य ज्ञान फेरी समाधान पाटील यांनी आयोजित केली होती. दुसरी फेरी प्रमिला भादुपोता यांनी बजर राऊंड फेरी आयोजित केली होती. फेरीत जलद निर्णय अपेक्षित होता. तिसरी फेरी रॅपिड फायर राउंड माधुरी किनगे यांनी आयोजित केली होती. फेरीत द्रुत विचार करणे अपेक्षित होते. चौथी फेरी वाक्प्रचार आणि म्हणी पूनम पाटील यांनी आयोजित केली होती. फेरीत मुहावरे आणि म्हणी मागील अर्थ उलगडण्याचे आव्हान होते.

स्पर्धेत मास्टर माइंड्सने विजय मिळविला

स्पर्धेत टीम मास्टर माइंड्सने १३० गुणांसह विजय मिळविला. टीम विकिपीडियाने प्रभावी कामगिरी दाखविली. १२० गुणांच्या स्कोअरसह उपविजेतेपद मिळविले. शेवटी ज्ञानेश्वर पाटील आणि प्राचार्य प्रवीण सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तथा आभार खुशी वाणी, हर्षिता बारी या विद्यार्थिनींनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here