महाबळ रोडपासून जिल्हा ग्रंथालयापर्यंत रस्ता तयार करा

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा ग्रंथालयाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२२ ला उद्घाटन झाले होते. तेव्हापासून जळगाव जिल्ह्यातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय खूप फायदेशीर ठरत आहे. जिल्हा ग्रंथालय किमान १.५ वर्षापासून सुरू झालेले आहे. परंतु पावसाळा बघता महाबळ रोड पशु वैद्यकीय कार्यालयापासून ते जळगाव जिल्हा ग्रंथालयापर्यंत रस्ता बनविलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पाणी व गारा होत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये मोटरसायकल अथवा सायकल घेऊन जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. पशुवैद्यकीय कार्यालय ते जिल्हा ग्रंथालयापर्यंत त्वरित रस्ता करण्यात यावा. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

ग्रंथालयाच्या सुंदर इमारतीसाठी ४ कोटी १९ लाख रुपय रक्कम लागलेली आहे. त्यासाठी रस्ता नसल्याने एवढ्या मोठ्या इमारतीचा उपयोग जास्त प्रमाणात होऊ शकत नाही. यासंदर्भात रस्ता संदर्भातला प्रस्ताव जळगाव बांधकाम विभाग येथून नियोजन विभाग येथे मागील वर्षांपासून प्रस्तावित पडून आहे. यासंदर्भाचा पाठपुरवठा करावा आणि रस्ता पावसाळ्यामध्ये व्हावा, अशी विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

यांच्या आहेत स्वाक्षऱ्या

निवेदनावर जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, सचिव महेंद्र सपकाळे, उपमहानगराध्यक्ष आशिष सपकाळे, हालीत शर्मा, सतिष सैंदाणे, चैतन पवार, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष साजन पाटील, किशोर खलसे, अक्षय लहाणे यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here