साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश भामरे यांची निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील परीक्षेची अंतिम यादी जाहीर झालेली आहे. त्यात बाम्हणे गावाच्या पोलीस पाटीलपदी गणेश धर्मराज भामरे यांची नियुक्ती झालेली आहे.
गणेश भामरे सध्या बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील तसेच बाम्हणे गावातील नागरिकांनीही त्यांचे कौतुक केले आहे. तसेच गणेश भामरे मित्रपरिवार व सर्व स्तरातील सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ‘साईमत’ अमळनेरचे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील, केंद्रप्रमुख भटू पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला.