विद्यापीठ अन्‌‍ जिटो यांच्यातील सामजंस्य करारावर स्वाक्षऱ्या

0
2

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) इन्क्युबेशन ॲण्ड इनोव्हेशन फाउंडेशन यांच्यातील सामजंस्य करारावर कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाने अनेक संस्था समवेत सामजंस्य करार करायला सुरूवात केली आहे. या धोरणात विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक असल्यामुळे या करारान्वये विद्यार्थ्यांना त्या संस्थामध्ये प्रशिक्षणाची संधी प्राप्त होणार आहे. गुरूवारी, २४ ऑगस्ट रोजी विद्यापीठात जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय संयोजक भारत ओसवाल यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नवउद्योजकांना प्रोत्साहन व स्टार्टअपला सहकार्य करणारे संघटन म्हणून जैन इंटरनॅशनलची ओळख आहे.

उद्योजकतेची संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न

करारामुळे नवीनता व नवकल्पनांवर आधारित उद्योजकतेची संस्कृती रूजविण्याचा प्रयत्न होणार आहे. शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, उद्योग व इतर संस्था यांच्यात नेटवर्क स्थापन करून स्टार्टअपसाठी प्रभावी इको सिस्टीम तयार करणे, उद्योजकतेसाठीचे नेतृत्व निर्माण करणे आदी प्रमुख उदिष्ट्ये करारामध्ये नमूद केली आहेत. विद्यार्थ्यांना जैन संघटन व त्यांच्या इतर उद्योग व्यवसायात इंटर्नशिपची संधी प्राप्त होईल.

यांची होती उपस्थिती

कराराप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, संघटनेच्या जळगाव शाखेचे पदाधिकारी भारत ओसवाल, मोहित बाफना, प्रवीण छाजेड, हरक सोनी, निरज सेठीया, निखिल कोठारी, आनंद कोठारी, सचिन चोरडीया, धरम सांखला, अनिमेष संचेती, अभिषेक राकेचा यांच्यासह विद्यापीठाच्या इन्क्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, डॉ. भूषण चौधरी, डॉ. विकास गिते, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, समीर पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here