साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी समाजवादी पार्टीतर्फे राज्यातील विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे. त्या पाश्वभूमीवर १ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक येथे कार्यक्रम आहेत. शहरातील हैदर अली चौकात समाजवादी पार्टीच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी समाजवादी पार्टीचे फलक अनावरण महाराष्ट्र राज्याचे महासचिव परवेज भाई सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष मायाबाई चौरे, युवा प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद, महासचिव जमील मन्सुरी, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी उपस्थित होते. त्यानंतर समाजवादी पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातून रॅली काढण्यात आली. याप्रसंगी महासचिव परवेज भाई सिद्दीकी म्हणाले की, समाजवादी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी तालुक्यातील तावखेडा येथील पोलीस पाटील डॉ. महेंद्र पाटील यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनी स्तुत्य उपक्रम राबवून तावखेडा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. वाढदिवस म्हटला की, मोठा केक डीजे व जेवणावळीवर मोठा खर्च केला जातो. मात्र, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून चि.निरंजनच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त डॉ.पाटील यांनी तावखेडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील होते. कार्यक्रमास उपसरपंच प्रदीप रोकडे, हिंमत गिरासे, नरेंद्र जाधव, तूषार पाटील, मुख्याध्यापक मगांसे, विशाल माध्यमिक शाळेच्या चेअरमन कोकिळा पाटील, विजूबाई जाधव, रेखाबाई पाटील उपस्थित होते.
साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी जिल्ह्यात जनावरांमधील लंपी त्वचेच्या साथरोगाचा प्रसार सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोवर्गिय जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, जत्रा, प्रदर्शने व बाजारपेठ बंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.यु.डी.पाटील यांनी दिली. लंपी संसर्गाच्या केंद्रापासून किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लंपी चर्मरोगाने बाधित गोवर्गीय पशुधन आढळून आले आहे. त्यात नंदुरबार ९५, नवापूर १, शहादा ४४, तळोदा २६, अक्कलकुवा ७२, धडगाव २७ असे जिल्ह्यात २६५ बाधित पशुधन आढळले आहेत. बाधित पशुधनांपैकी ८३ पशुरुग्ण औषधोपचाराने बरी झाले आहेत. तसेच ११ पशु मृत झाले आहेत.…
साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांपासून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला अखेर बुधवारी, ६ सप्टेंबर रोजी दिलासा मिळाला. दुपारी पावणेचार वाजता पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, विजेच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. पावसाच्या आगमनाने सारेच सुखावले. तसेच पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. शिंदखेडा तालुक्यात एक लाख हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची लागवड झाली आहे. हवामान अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली. मात्र, जून महिन्यात पाऊस झाल्यानंतर जवळपास दोन महिने पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यात २५ हजार हेक्टर क्षेत्र लागवडीविना राहिले आहे. महागाची बियाणे शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावले. यंदा तरी पाऊस चांगला…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या संशयित आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला शहर पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले होते. सविस्तर असे की, चाळीसगाव शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ३१ ऑगस्ट रोजी तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी १ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पीडित मुलीला शुभम संजय मोरे (रा. चाळीसगाव) याने पीडित मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले.…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जालना येथील अंतरवाली सराटी येथील आंदोलककर्त्यांना झालेल्या लाठीचार्जच्या प्रकाराचा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेने जाहीर निषेध करुन दोषी अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन तहसिलदारांना नुकतेच देण्यात आले. निवेदन देतेवेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शहर प्रमुख नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भिमराव खलाणे, माजी तालुका प्रमुख धर्मा काळे, शहर महिला आघाडी प्रमुख कविता साळवे, अल्पसंख्यांक आघाडीचे शहरप्रमुख वसीम शेख रज्जाक, महेंद्र जैस्वाल, शैलेंद्र सातपुते, संजय ठाकरे, आबासाहेब पाटील, चंद्रकांत नागणे, संजय साळवे, किरण आढाव, राजन कुमावत, भुरण अण्णा, चेतन आढाव, सचिन ठाकरे, रामेश्वर चौधरी, गौतम…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे बाजारातील आनंदा मातेची विधीवत पूजा करून आनंदा आईला पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष खुशाल बिडे, शहर उपाध्यक्ष कैलास पाटील, शहर सचिव नंदकिशोर जाधव, मराठा महासंघाचे कायदेशीर सल्लागार ॲड. निळकंठ पाटील, ॲड. दीपक वाघ, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किरण आढाव, चेतन आढाव, नामदेवराव तुपे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी यंदा श्रावण मासात पाऊस न पडल्याने हवालदिल झाला आहे. थोडीफार आलेली पिके करपून गेले आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळे चाळीसगाव तालुका दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा आणि…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील लक्ष्मीनगरातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे यंदा पहिल्यांदा कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावडयात्रेचे ‘जय भोले’च्या जयघोषात वाजत गाजत आगमन झाले. यंदा प्रथमच श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे लक्ष्मीनगर कावड यात्रा सुरू केली आहे. यंदा २५ शिवभक्त कावडयात्रेत सहभागी झाले होते. सर्व शिवभक्तांनी प्रारंभी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे तापी नदीवर जाऊन विधिवत पूजा करून कावडीत तापी मातेचे पवित्र जल भरून कावडयात्रेला सुरुवात झाली. नीम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर तापी नदीच्या जल महादेव मंदिरात पूजनाने अभिषेक करण्यात आला. कावडयात्रेत यांनी घेतला सहभाग ही कावडयात्रा शांतीलाल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील उर्दू हायस्कूलमधील काही चमको संचालक मंडळांनी शिक्षक दिनी शिक्षकांची सुयोग्य पडताळणी न करता शिक्षकांना अवार्ड देऊन त्यांचा सन्मान केला. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे ही निवड अयोग्य ठरली असल्याचा सूर पालक वर्गातून उमटत आहे. संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून काही शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करीत आहे. आजपर्यंत त्यांची, संस्थेची किंवा पालकांची विद्यार्थ्यांची एकही तक्रार नाही. जे शिक्षक व्यसन करतात, शाळेच्या वेळात आपली घरची काम करतात, घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी मारतात, जे घरी शाळेच्या जास्त क्लासेसच्या नावाखाली घरी खासगी क्लासेस चालवितात, अश्ाा शिक्षकांना संस्थेने अवार्ड देऊन सन्मानित केल्याचे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमधून चर्चेचा सूर…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर येथील विविध माध्यमिक विद्यालयात भारताचे राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षकदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शाळेतील तासिका घेऊन ज्ञानार्जनाचे काम केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच केले. त्यात कन्या माध्यमिक विद्यालय, भारती विद्या मंदिर, साधना माध्यमिक विद्यालय, विद्यार्थी व शिक्षकांनी मिळून शिक्षक दिवस साजरा केला.