साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
जिल्ह्यात जनावरांमधील लंपी त्वचेच्या साथरोगाचा प्रसार सुरु झाल्याने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गोवर्गिय जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, जत्रा, प्रदर्शने व बाजारपेठ बंद करण्यात यावेत, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.यु.डी.पाटील यांनी दिली.
लंपी संसर्गाच्या केंद्रापासून किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लंपी चर्मरोगाने बाधित गोवर्गीय पशुधन आढळून आले आहे. त्यात नंदुरबार ९५, नवापूर १, शहादा ४४, तळोदा २६, अक्कलकुवा ७२, धडगाव २७ असे जिल्ह्यात २६५ बाधित पशुधन आढळले आहेत. बाधित पशुधनांपैकी ८३ पशुरुग्ण औषधोपचाराने बरी झाले आहेत. तसेच ११ पशु मृत झाले आहेत. सद्यस्थितीत १७१ पशुरुग्ण असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु.डी.पाटील यांनी दिली.