साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील लक्ष्मीनगरातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे यंदा पहिल्यांदा कपिलेश्वर ते अमळनेर पायी कावडयात्रेचे ‘जय भोले’च्या जयघोषात वाजत गाजत आगमन झाले. यंदा प्रथमच श्री ओंकारेश्वर महादेव मंदिर संस्थानतर्फे लक्ष्मीनगर कावड यात्रा सुरू केली आहे. यंदा २५ शिवभक्त कावडयात्रेत सहभागी झाले होते.
सर्व शिवभक्तांनी प्रारंभी कपिलेश्वर महादेव मंदिर येथे तापी नदीवर जाऊन विधिवत पूजा करून कावडीत तापी मातेचे पवित्र जल भरून कावडयात्रेला सुरुवात झाली. नीम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी यांनी शिवभक्तांचे स्वागत केले. श्री क्षेत्र ओंकारेश्वर मंदिर परिसरात आल्यानंतर तापी नदीच्या जल महादेव मंदिरात पूजनाने अभिषेक करण्यात आला.
कावडयात्रेत यांनी घेतला सहभाग
ही कावडयात्रा शांतीलाल पाटील, दिलीप पाटील, धनराज चौधरी, घनश्याम पाटील, रवींद्र मुसळे, चंद्रकांत पाटकरी, सखाराम पाटील, गुलाबराव पाटील, वाय.एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. यात्रेत विशाल सोनार, जयेश अहिरराव, जयेश कासार, निखिल जळोदकर, चेतन कासार, रोहित चौधरी, अलका चौधरी, नलिनी बाविस्कर, आशाबाई पाटील, सीमा पाटील, नंदिनी राजपूत, सागर कुलथे, राहुल चौधरी, रेखाबाई जळोदकर, प्रथमेश पाटील, पियुष पवार, शिवाजी लोहार आदी सहभागी झाले होते.