शिंदखेडात समाजवादी पार्टीचे फलक अनावरण

0
3

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी

समाजवादी पार्टीतर्फे राज्यातील विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यात जनसंवाद यात्रा आयोजित केली आहे. त्या पाश्वभूमीवर १ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक येथे कार्यक्रम आहेत. शहरातील हैदर अली चौकात समाजवादी पार्टीच्या जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी समाजवादी पार्टीचे फलक अनावरण महाराष्ट्र राज्याचे महासचिव परवेज भाई सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला प्रदेश अध्यक्ष मायाबाई चौरे, युवा प्रदेश अध्यक्ष फहाद अहमद, महासचिव जमील मन्सुरी, धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी उपस्थित होते. त्यानंतर समाजवादी पार्टी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातून रॅली काढण्यात आली.

याप्रसंगी महासचिव परवेज भाई सिद्दीकी म्हणाले की, समाजवादी पक्षाची धुळे जिल्ह्यासह शिंदखेडा तालुक्यात ताकद वाढवा. समाजवादी पार्टीचे उमेदवार प्रत्येक निवडणुकीत उभे करा आणि निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. महिला प्रदेशाध्यक्ष मायाबाई चौरे यांनी मनोगत व्यक्त केले.

रॅलीत यांचा होता सहभाग

रॅलीत जाकीर शेख, इरमान शेख सदर, डॉ. युनिस कुरेशी, जलाल शेख रज्जाक, रहीम खान पठाण, हमीदा पोलीस, गुलाम हुसेन खा, उवेद खा, डॉ शाकीर कुरेशी, उसमान अशारफी, मोसीन मन्सुरी, संजुम खाटीक, शकीला मनियार, तनवीर खाटीक, जावेद मनियार, एजाज कुरेशी, शाकीर लोहार, जहुर शेख, तालीब कुरेशी, डॉ. वसीम कुरेशी, आसीफ कुरेशी, गाजी आबा, इमरान कुरेशी, करीम धोबी, फिरोज खान, नदिम शेख, तालीब सलिम कुरेशी, बापु गिरासे, रजेसिंग सिसोदे, पप्पु शेख, हारुन खा सहभागी झाले होते. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. इद्रिस कुरेशी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here