तावखेडा शाळेत शिक्षकदिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

0
2

साईमत, शिंदखेडा : प्रतिनिधी

तालुक्यातील तावखेडा येथील पोलीस पाटील डॉ. महेंद्र पाटील यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त शिक्षकदिनी स्तुत्य उपक्रम राबवून तावखेडा जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.

वाढदिवस म्हटला की, मोठा केक डीजे व जेवणावळीवर मोठा खर्च केला जातो. मात्र, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून चि.निरंजनच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त डॉ.पाटील यांनी तावखेडा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील होते. कार्यक्रमास उपसरपंच प्रदीप रोकडे, हिंमत गिरासे, नरेंद्र जाधव, तूषार पाटील, मुख्याध्यापक मगांसे, विशाल माध्यमिक शाळेच्या चेअरमन कोकिळा पाटील, विजूबाई जाधव, रेखाबाई पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here