साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील उर्दू हायस्कूलमधील काही चमको संचालक मंडळांनी शिक्षक दिनी शिक्षकांची सुयोग्य पडताळणी न करता शिक्षकांना अवार्ड देऊन त्यांचा सन्मान केला. त्यामुळे गुणवत्ताधारक शिक्षकांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे ही निवड अयोग्य ठरली असल्याचा सूर पालक वर्गातून उमटत आहे.
संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून काही शिक्षक चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करीत आहे. आजपर्यंत त्यांची, संस्थेची किंवा पालकांची विद्यार्थ्यांची एकही तक्रार नाही. जे शिक्षक व्यसन करतात, शाळेच्या वेळात आपली घरची काम करतात, घराचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणी मारतात, जे घरी शाळेच्या जास्त क्लासेसच्या नावाखाली घरी खासगी क्लासेस चालवितात, अश्ाा शिक्षकांना संस्थेने अवार्ड देऊन सन्मानित केल्याचे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांमधून चर्चेचा सूर उमटत आहे. जे शिक्षक चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना देतात. त्यांचा काही चमको संचालकांनी विचारच केलेला नाही, अशीही चर्चा सुरु आहे. अवार्ड दिलेल्या शिक्षकांमध्ये काय गुणवत्ता आढळून आली. त्यांची संचालकांनी पडताळणी न करता त्यांचा गुणगौरव केला कसा? असा प्रश्न आता पालक वर्गामधून उपस्थित होत आहे.