साईमत, जळगाव : प्रतिनिधी एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या सहाय्याने उत्तम यश संपादन करता येते. म्हणूनच एकाग्रता आणि स्मरणशक्तीला ‘यशाची गुरुकिल्ली’ आहे, असे प्रतिपादन मानसोपचार तज्ज्ञ पूनम गेडाम यांनी केले. येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनियरिंग ॲन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील करियर काउंसलिंग ॲण्ड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेल यांच्यातर्फे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘तणावमुक्त अभ्यास, सातत्य आणि एकाग्रता’ विषयावरील कार्यशाळेत त्या बोलत होते. अध्यक्षस्थानी रायसोनी इन्स्टिट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल होत्या. व्यासपीठावर ॲकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभाग प्रमुख प्रा. डॉ.कौस्तव मुखर्जी उपस्थित होते. एकाग्रता वाढविण्याच्या टिप्स एकावेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करा, कोणतेही काम मन लावून व काम करताना आरामदायी…
Author: Sharad Bhalerao
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जीवनात ध्येयपूर्तीकरीता मुल्य शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे सूत्र आहे. मुल्य शिक्षणाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व पर्यायाने सर्वांगीण विकास साधता येतो. मूल्य शिक्षण हे जीवनाची दशा व दिशा ठरवित असते. मुल्यांचा अभाव माणसाला बौद्धिक कमकुवत बनवत असतो. यासाठी दैनंदिन व्यवहारात आचरण कधीही सगळ्यांसमोर आदर्श ठेवणारे असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये मुल्य संवर्धन होण्याच्या दृष्टीने ‘मुल्य शिक्षण’ विषयावर प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समुपदेशक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा.अभिजीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या पंधरा वर्षांपासून सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरूणमधील मिल्लत कनिष्ठ महाविद्यालय येथे हिंदी दिनाचे औचित्य साधून अतिथी व्याख्यान आयोजित केले होते. त्यासाठी इकरा एचजे थीम कला व विज्ञान महाविद्यालय, जळगाव येथील हिंदी विभागप्रमुख डॉ. राजेश भामरे यांनी ‘हिंदी भाषेत रोजगाराच्या संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी हिंदी भाषेचा थोडक्यात ऐतिहासिक आढावाही मांडला. मिल्लतचे माजी पर्यवेक्षक मुहम्मद रफिक पटवे यांनी हिंदी ही सर्वसामान्यांची भाषा असल्याचे सांगून तिची सहजता आणि सोयी सांगितल्या. हिंदी विभागप्रमुख शेख जय्यान अहमद यांनी हिंदी दिनाची रूपरेषा मांडली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. ज्याची सुरुवात ११ वीच्या मुहम्मद इस्माईलने या विद्यार्थ्याने पवित्र कुराण पठाणाने केली. मस्कान शेख यांनी…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक व विभागीय समन्वयक यांची पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती जाहीर केली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यातील १०३ अनुदानित व २१ स्वंयनिर्वाहित महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यरत आहेत. त्यात १६ हजार ६०० अनुदानित आणि ३ हजार स्वंयनिर्वाहित विद्यार्थी नियमित कार्यक्रमात सहभागी आहेत. त्यापैकी ८ हजार ३०० अनुदानित आणि १ हजार ५०० स्वयंनिर्वाहित विशेष शिबिरात सहभागी होत असतात. तीन जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक म्हणून पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. त्यात जळगाव जिल्हा- डॉ. दिनेश पाटील (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी), धुळे जिल्हा डॉ. हेमंतकुमार पाटील (आरडीएफ वरिष्ठ महाविद्यालय, म्हसदी),…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथील तब्बल ४ पहेलवानांनी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तसेच कमल लॉन्स, एरंडोल तथा तालुका क्रीडा संकुल, चाळीसगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ व १९ वर्षाआतील गटात विजेतेपद प्राप्त केले आहे. त्यांची येवला, जि.नाशिक येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी पहेलवानांमध्ये जयदीप कैलास सोनवणे, स्वराज प्रल्हाद चौधरी, कु.पायल कैलास सोनवणे, धीरज शरद पाटील यांचा समावेश आहे. यशस्वी खेळाडूंना शरद पाटील, अनिल बिऱ्हाडे, सयाजी मदने, संतोष कराळे, प्रल्हाद चौधरी, श्रीराम चौधरी,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आणि मुलांची शाळा यांच्या शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. कन्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद सीताराम कोळी तर उपाध्यक्षपदी कैलास जगतसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश भोंबे तर उपाध्यक्षपदी कैलास परदेशी यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुमावत यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी, २० सप्टेंबर रोजी साखळी उपोषण करण्यात आले. सध्या महाराष्ट्रात होत असलेली मराठा समाजाची परवड आणि एकूण परिस्थिती बघता राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण करण्यात आले. चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २० ते २७ सप्टेंबरपर्यंत सलग अठवडाभर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील जीपीएस कॅम्पसमध्ये प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पहिल्याचवर्षी विविध कार्यक्रमाद्वारे भाविकांचे लक्ष वेधले जात आहे. गुलाबराव फाउंडेशन आणि प्रतापराव पाटील मित्र परिवार यांच्यामार्फत जीपीएस कॅम्पसमध्ये प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पहिल्याचवर्षी मंडळाने नेपाळ येथील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचा देखावा उभा केला आहे. हे मंडळ सातही दिवस विविध उपक्रम राबविणार आहे. त्यात दररोज विविध अधिकारी वर्ग यांनी आरतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. सहाव्या दिवशी पूर्ण सिद्ध केलेले १० हजार रुद्राक्ष वाटपाचा मंडळाचा निर्धार आहे. प्रथम दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत उज्जैन येथील डमरू पथक तर शेवटच्या दिवशी मध्यप्रदेश येथील आदिवासी नृत्य पथक हे भाविकांचे लक्ष वेधून…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी येथील संत सावता माळी समाज पंचमंडळ, मोठा माळीवाडा समाज भवनात सत्यशोधक समाज संघाची अभ्यासगट व चर्चा बैठक नुकतीच घेण्यात आली. अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक समाज संघाचे राज्य सचिव डॉ.सुरेश झाल्टे(धुळे), सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक विजय लुल्हे (जळगाव), विधीकर्ते शिवदास महाजन (एरंडोल) आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्यशोधक अधिवेशन पत्रिकांचा शुभारंभ करून सर्वांना पत्रिकांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.सुरेश झाल्टे यांनी सत्यशोधक चळवळीचा इतिहास उलगडला. सत्यशोधक समाज संघाचे महत्त्व सांगून सत्यशोधक विचारांवर चालण्याची गरज आहे. महाराष्ट्रात सत्यशोधक विधीकर्ते निर्माण करून प्रत्येकाने सत्यशोधक विधीप्रमाणे विधी करावेत, असे…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथ. विद्यालय, श्याम भगवानदास अग्रवाल बालक मंदिर व आनंदा सुपडू वाणी शिशू विकास या शाळा समितीच्या चेअरमनपदी विद्यमान संचालक जितेंद्र आनंदा वाणी यांची बुधवारी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष नारायणदास अग्रवाल यांनी निवड केली. नियुक्तीचे पत्र अग्रवाल यांच्या हस्ते वाणी यांना देण्यात आले. कनकसिंग राजपूत यांच्या निधनाने रिक्त झालेल्या संचालक पदावर उंबरखेडे येथील सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र कनकसिंग राजपूत यांचीही निवड केली आहे. पटेल विद्यालयास प्राथमिक शिक्षणाची ६७ वर्षाची परंपरा आहे. शाळेत शिशू विकास ते १ ली ते ४ थीचे वर्ग भरतात. विद्यार्थी पटसंख्या एक हजाराहून अधिक आहे. माफक…