जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत गो.पु.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

0
20

साईमत, भडगाव : प्रतिनिधी

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील, किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलीत, गोपीचंद पुना पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव ता.भडगाव येथील तब्बल ४ पहेलवानांनी जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित तसेच कमल लॉन्स, एरंडोल तथा तालुका क्रीडा संकुल, चाळीसगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १७ व १९ वर्षाआतील गटात विजेतेपद प्राप्त केले आहे. त्यांची येवला, जि.नाशिक येथे पार पडणाऱ्या नाशिक विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेतील यशस्वी पहेलवानांमध्ये जयदीप कैलास सोनवणे, स्वराज प्रल्हाद चौधरी, कु.पायल कैलास सोनवणे, धीरज शरद पाटील यांचा समावेश आहे.

यशस्वी खेळाडूंना शरद पाटील, अनिल बिऱ्हाडे, सयाजी मदने, संतोष कराळे, प्रल्हाद चौधरी, श्रीराम चौधरी, साहिल संकपाळ, कैलास सोनवणे, सुरेश सोनवणे, आदर्श क्रीडा शिक्षक बी.डी.साळुंखे, प्रा.रघुनाथ पाटील, प्रा.प्रेमचंद चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, सचिव डॉ.पूनम पाटील, अव्वर सचिव प्रशांतराव पाटील, प्राचार्य सुनील पाटील, पर्यवेक्षक अनिल पवार, प्र.कार्यवाहक रघुनाथ पाटील यांनी तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here