साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक व विभागीय समन्वयक यांची पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती जाहीर केली आहे.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील तीन जिल्ह्यातील १०३ अनुदानित व २१ स्वंयनिर्वाहित महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना एकक कार्यरत आहेत. त्यात १६ हजार ६०० अनुदानित आणि ३ हजार स्वंयनिर्वाहित विद्यार्थी नियमित कार्यक्रमात सहभागी आहेत. त्यापैकी ८ हजार ३०० अनुदानित आणि १ हजार ५०० स्वयंनिर्वाहित विशेष शिबिरात सहभागी होत असतात. तीन जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक म्हणून पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती केली आहे. त्यात जळगाव जिल्हा- डॉ. दिनेश पाटील (गरूड महाविद्यालय, शेंदुर्णी), धुळे जिल्हा डॉ. हेमंतकुमार पाटील (आरडीएफ वरिष्ठ महाविद्यालय, म्हसदी), नंदुरबार जिल्हा डॉ. विजय पाटील (आरएफएन वरिष्ठ महाविद्यालय, अक्कलकुवा) यांचा समावेश आहे.
अकरा विभागीय समन्वयकांमध्ये भुसावळ डॉ. अनिल बारी (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड), रावेर डॉ. जयंत नेहते (सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय, ऐनपूर ता. रावेर), जळगाव डॉ. राजू गवरे (एच.ज.थीम चे कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरूण जळगाव), पारोळा डॉ. योगेश पुरी (एस.एम.एम. साहित्य, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पाचोरा), चोपडा डॉ. दिलीप गिऱ्हे (पंकज कला महाविद्यालय, चोपडा), धुळे (पश्चिम) डॉ. हेमंत जोशी (मा. ध. पालेशा वाणिज्य महाविद्यालय, धुळे), धुळे (उत्तर) डॉ. सुनील पाटील (एसएसव्हीपीएसचे डॉ. पी.आर. घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), शिरपूर डॉ. अतुल खोसे (श्रीमती एचआर पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर), डॉ. विश्वास भामरे (सि.गो.पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, साक्री), डॉ. अमोल भुयार (जीटीपी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार), डॉ. मनोहर पाटील (महाराज ज.पो. वळवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धडगाव) यांचा समावेश असल्याची माहिती रासेयो संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी दिली.