दैनंदिन व्यवहारात सर्वांसमोर आचरण आदर्श असणारे ठेवा

0
3

साईमत, जळगाव : प्रतिनिधी

जीवनात ध्येयपूर्तीकरीता मुल्य शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाचे सूत्र आहे. मुल्य शिक्षणाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व पर्यायाने सर्वांगीण विकास साधता येतो. मूल्य शिक्षण हे जीवनाची दशा व दिशा ठरवित असते. मुल्यांचा अभाव माणसाला बौद्धिक कमकुवत बनवत असतो. यासाठी दैनंदिन व्यवहारात आचरण कधीही सगळ्यांसमोर आदर्श ठेवणारे असले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. अभिजीत कुलकर्णी यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये मुल्य संवर्धन होण्याच्या दृष्टीने ‘मुल्य शिक्षण’ विषयावर प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे समुपदेशक, लेखक, प्रेरणादायी वक्ते प्रा.अभिजीत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या पंधरा वर्षांपासून सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजकता विकास योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा रत्ना जैन, कार्याध्यक्षा मिनाक्षी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून योजनेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केले जाते.

प्रा.अभिजीत कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. तसेच दहा जीवनमुल्यांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. त्यांनी मुल्यांवर विविध उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना महत्त्व समजून दिले. कार्यशाळेला विद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, रुपाली रोझतकर आदी उपस्थित होते. उपक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य व व्यवस्थापन यांच्याबद्दल एसडी-सीड गव्हर्निग बोर्डचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सुत्रसंचलन एसडी-सीड समन्वयक विरभूषण पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here