जीपीएस कॅम्पसमध्ये प्रथमच गणेशोत्सव पशुपतीनाथ मंदिराचा देखावा

0
3

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील जीपीएस कॅम्पसमध्ये प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पहिल्याचवर्षी विविध कार्यक्रमाद्वारे भाविकांचे लक्ष वेधले जात आहे.

गुलाबराव फाउंडेशन आणि प्रतापराव पाटील मित्र परिवार यांच्यामार्फत जीपीएस कॅम्पसमध्ये प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. पहिल्याचवर्षी मंडळाने नेपाळ येथील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिराचा देखावा उभा केला आहे. हे मंडळ सातही दिवस विविध उपक्रम राबविणार आहे. त्यात दररोज विविध अधिकारी वर्ग यांनी आरतीसाठी बोलाविण्यात येणार आहे. सहाव्या दिवशी पूर्ण सिद्ध केलेले १० हजार रुद्राक्ष वाटपाचा मंडळाचा निर्धार आहे.

प्रथम दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत उज्जैन येथील डमरू पथक तर शेवटच्या दिवशी मध्यप्रदेश येथील आदिवासी नृत्य पथक हे भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. मंडळाचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंडळाला कोणीही अध्यक्ष नसून पाळधी गावातील सर्व स्तरावरील नागरिक यात प्रामुख्याने सहभागी झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here