पाळधी कन्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद कोळी

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पाळधी येथील जिल्हा परिषद कन्या शाळा आणि मुलांची शाळा यांच्या शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समितीच्या अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली. कन्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विनोद सीताराम कोळी तर उपाध्यक्षपदी कैलास जगतसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मुलांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश भोंबे तर उपाध्यक्षपदी कैलास परदेशी यांची निवड करण्यात आली.

यावेळी व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश कुमावत यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here