मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करा

0
2

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने बुधवारी, २० सप्टेंबर रोजी साखळी उपोषण करण्यात आले.

सध्या महाराष्ट्रात होत असलेली मराठा समाजाची परवड आणि एकूण परिस्थिती बघता राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीत समावेश करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण करण्यात आले. चाळीसगाव सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने २० ते २७ सप्टेंबरपर्यंत सलग अठवडाभर साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधव, महिला भगिनी, विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. २० रोजी झालेल्या साखळी उपोषणात ३०० च्या जवळपास मराठा समाज बांधव सहभागी झाले होते.

यांचा होता सहभाग
उपोषणात लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार, प्रमोद पाटील, विजय पाटील, खुशाल पाटील, तमाल देशमुख, सुदर्शन देशमुख, भाऊसाहेब पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, विकास पवार, कुणाल पाटील, सुनील पाटील, गोकुळ पाटील, मनोज भोसले, डॉ.अजय पाटील, राकेश राखुंडे, अविनाश काकडे, प्रदीप मराठे, दीपक देशमुख, योगेश पाटील, प्रदीप देशमुख, पंकज पवार, अक्षय पवार, भैय्यासाहेब पाटील, प्रकाश पाटील, राजेंद्र पाटील, दिनकर कडलग, शेखर देशमुख, राजेंद्र पाटील, जितेंद्र गायकवाड, सुनील पाटील, पंकज पवार, नितीन पाटील, किशोर देशमुख, रामराव देशमुख, हर्षल पाटील, मनोज भोसले, राकेश निकम, प्रताप पाटील, निवृत्ती पाटील, सन्मान पाटील, छोटु पाटील, प्रमोद सूर्यवंशी, दिलीप पाटील, रणधीर जाधव, उत्तमराव पाटील सहभागी झाले होते.

यांनी दिला पाठिंबा

साखळी उपोषणाला मा. आमदार राजीव देशमुख, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, सुधाकर मोरे, मा.नगरसेवक सुरेश चौधरी, रामचंद्र जाधव, जगदीश चौधरी, गफूर शेख, प्रा.तुषार निकम, सुधाकर राठोड, विजय शर्मा, किशोर जाधव, पत्रकार भुरण घुले, ॲड.संग्रामसिंग शिंदे, सोनु फोजी यांनी पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here