Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्याकरीता मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, इतर विभाग प्रमुख यांच्या समवेत अखिल महाराष्ट्र सफाई कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची मंगळवारी, ७ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत मांडलेल्या विषयांवर लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी जाहीर केले. बैठकीत नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या मृत व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र सफाई कामगारांच्या वारसांना जुनी पेन्शन व ग्रॅज्युटी अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांना आश्‍वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. त्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात येईल. महिला विशाखा समितीमध्ये सफाई कामगारांचे प्रतिनिधी घेण्यात येतील.…

Read More

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक शुभम संजय भोई यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑल एशियन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक प्रकारात २१ वर्षाआतील वयोगटात सुवर्ण पदक पटकावले. स्पर्धेत त्यांनी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांना पराभूत केले आहे. जिल्ह्यातील खेळाडूने हे यश मिळविले असून महाराष्ट्र राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील यशामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. आता ते आशिया खंडाचे नेतृत्व करणार आहे. पाळधी येथील शाळेत ते गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये पारंगत केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकले आहे. त्यांच्या यशाबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व समाज बांधवांतर्फे कोळी समाजाचे दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन लोहारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक खरे, ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास चौधरी, शरद कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार, विकासोचे संचालक विकास देशमुख, लक्ष्मण कोळी, ज्येष्ठ नागरिक शांताराम कोळी, विकास कोळी, योगेश कोळी, अमोल कोळी, संभाजी कोळी, रमेश कोळी यांच्यासह समाज बांधवांनी केले. यावेळी रथावर महर्षी वाल्मिक ऋषी, लवकुश यांच्या सजीव वेशभूषा परिधान करून बँडच्या गजरात फुलांची उधळण करत संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयातील तहसिलदारांच्या दालनात बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वांचा परिचय करण्यात आला. हिरापूरचे नवनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील उर्वरित सर्व कमिटीतील सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कारासह स्वागत करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी आपला परिचय कमिटी समोर मांडला. त्यावेळी सर्व समितीतील सदस्यांनी समाजातील सर्व गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतली. आ.मंगेश चव्हाण आणि तालुकाध्यक्ष सुनील निकम यांचा विचार पुढे घेऊन जाण्याची शाश्‍वती दिली. बैठकीनिमित्त आ.मंगेश चव्हाण यांनी समितीतील सदस्यांशी संवाद साधताना आपले विचार बैठकीत मांडले. आपल्या समाजातील गरिबांसाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आपल्यापासून सुरुवात करण्याचा संकल्प करू या…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, मागील वीज बिलाची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात यावी, कापूस पिकावर आलेल्या लाल्या रोग व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, सोयाबीन पिकावर आलेला पिवळा मोझक व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्यांची टंचाई भासत आहे.…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी दिवाळीचा मंगलमय सण तोंडावर आला आहे. अशातच घरोघरी दिवाळीसाठी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. धावपळीच्या जीवनात फराळ बनविण्यासाठी महिला भगिनींची धावपळ दिसून येत आहे. स्टेशन रोड स्थित परिसरातील महिला भगिनींची आपल्या अपेक्षेनुसार चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे. काळ बदलला, जगण्याची शैली बदलली, आनंदाच्या कल्पना बदलल्या, ताण बदलले या बदलत्या जगात जगताना ग्रामीण भागासह शहरी भागात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा अद्यापही जोपासली जात आहे. या परंपरेनुसार हा सण साजरा केला जात आहे. आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीत लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा, सांजोऱ्या, अनारसे वगैरे पदार्थांचे…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाचोरा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी क्षितिज चौधरी यांनी चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने बाणगाव येथील धरणात धडक मोहीम राबविली. रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी दिलीप नागरे, क्लर्क गणेश देवरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बाणगाव धरणाच्या पाण्याच्या बाबतीत निवेदन दिले होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर बाणगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा असताना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा बेसुमार उपसा होत होता. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाचोरा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी क्षितीज चौधरी, सहायक अभियंता अक्षय देशमुख, लिपीक देविदास पाटील, वाहन चालक महाजन, चौकीदार अण्णा निकाळे यांच्या पथकाने…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्य सरकारने चाळीसगाव तालुका नुकताच दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला आहे. शहरातील विमानतळ भागातून लेआऊटच्या ठिकाणी असलेल्या विहिरीतून अमर्याद पाणी उपसा सुरु केला आहे. म्हणून या भागातील विहिरीतून टँकरद्वारे होणारा पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी दैनिक ‘साईमत’च्या माध्यमातून केली आहे. यंदाचे वर्ष दमदार पाऊस न झाल्यामुळे दुष्काळग्रस्त ठरले आहे. त्यामुळे नळाला पाच दिवसांनी पाणी येते. त्यातच जमिनीत पाणी शिल्लक नाही. बारा, तेरा हजार लिटरचे पाणी टँकरने एमआयडीसीतील एका नामांकित ठिकाणी पाणी पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. ह्या विहिरीतून पाण्याचा उपसा रात्री केला जातो. आधीच चाळीसगाव तालुक्यात पाऊस न झाल्यामुळे दुष्काळ आहे. त्यात या…

Read More

साईमत, लोहारा, ता. पाचोरा : वार्ताहर जामनेर तालुक्यातील नेरी आणि नाचणखेडा भागात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जामनेरच्या तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांना नुकतेच निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांसह कृषी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आश्‍वासन दिले आहे. निवेदन देतेवेळी नाचणखेडा येथील युवा शेतकरी अमोल चौधरी, रोहित चौधरी, भूषण चौधरी, किरण मोरे, छोटू भगत, संदीप पाटील, रमेश चौधरी, ज्ञानेश्‍वर चौधरी, राजेंद्र चौधरी, नेरी येथील सागर कुमावत, ऋषीकेश पाटील आदी उपस्थित होते. तालुक्यातील नाचणखेडा आणि नेरी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिरावून नेला आहे. ठिबक सिंचनावर कपाशीची…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या जीविताला धोका संभविण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी, ४ नोव्हेंबर रोजी चाळीसगावचे तहसीलदार यांच्याद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आरक्षणाच्या मुद्यांसाठी अनेक नेते लढले आहेत. त्यात प्रामुख्याने स्व.आण्णासाहेब पाटील, स्व.आ.विनायक मेटे यांचा घातपात झाला की अपघात, हे अद्यापही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्यामुळे त्यांची समाजाला खूप गरज असल्यामुळे त्यांच्या जिविताला धोका संभविण्याची शक्यता अथवा त्यांचा घातपात होवू शकतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने…

Read More