साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर
येथील महर्षी वाल्मिक मित्र मंडळ व समाज बांधवांतर्फे कोळी समाजाचे दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती नुकतीच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मीक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन लोहारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक खरे, ग्रामपंचायतीचे सदस्य कैलास चौधरी, शरद कोळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक पवार, विकासोचे संचालक विकास देशमुख, लक्ष्मण कोळी, ज्येष्ठ नागरिक शांताराम कोळी, विकास कोळी, योगेश कोळी, अमोल कोळी, संभाजी कोळी, रमेश कोळी यांच्यासह समाज बांधवांनी केले.
यावेळी रथावर महर्षी वाल्मिक ऋषी, लवकुश यांच्या सजीव वेशभूषा परिधान करून बँडच्या गजरात फुलांची उधळण करत संपूर्ण गावातून मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सर्व समाज बांधव, भगिनी, युवक सहभागी झाले होते.