घरोघरी फराळ बनविण्यात महिला वर्ग व्यस्त

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

दिवाळीचा मंगलमय सण तोंडावर आला आहे. अशातच घरोघरी दिवाळीसाठी चमचमीत फराळाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. धावपळीच्या जीवनात फराळ बनविण्यासाठी महिला भगिनींची धावपळ दिसून येत आहे. स्टेशन रोड स्थित परिसरातील महिला भगिनींची आपल्या अपेक्षेनुसार चविष्ट पदार्थ बनविण्यासाठी लगबग सुरु झाल्याचे दिसून येत आहे.

काळ बदलला, जगण्याची शैली बदलली, आनंदाच्या कल्पना बदलल्या, ताण बदलले या बदलत्या जगात जगताना ग्रामीण भागासह शहरी भागात पूर्वापार पद्धतीने चालत आलेली दिवाळी साजरी करण्याची परंपरा अद्यापही जोपासली जात आहे. या परंपरेनुसार हा सण साजरा केला जात आहे. आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीत लाडू, चकली, शंकरपाळे, चिवडा, सांजोऱ्या, अनारसे वगैरे पदार्थांचे कमालीचे अप्रूप राहिले आहे. त्यात घरगुती फराळालाच पसंत मिळत असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here