पाळधीचे क्रीडा शिक्षक शुभम भोई यांना सुवर्णपदक

0
1

साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर

येथील गुलाबराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक शुभम संजय भोई यांनी दिल्ली येथे सुरु असलेल्या ऑल एशियन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत भालाफेक प्रकारात २१ वर्षाआतील वयोगटात सुवर्ण पदक पटकावले. स्पर्धेत त्यांनी नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश यांना पराभूत केले आहे. जिल्ह्यातील खेळाडूने हे यश मिळविले असून महाराष्ट्र राज्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. स्पर्धेतील यशामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. आता ते आशिया खंडाचे नेतृत्व करणार आहे.

पाळधी येथील शाळेत ते गेल्या वर्षभरापासून कार्यरत आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये पारंगत केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये चमकले आहे. त्यांच्या यशाबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष विक्रमराव पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here