मनोज जरांगे-पाटील यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा द्यावी

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी लढणारे संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या जीविताला धोका संभविण्याची शक्यता असल्यामुळे शासनाने ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची मागणी चाळीसगाव सकल मराठा समाजाच्यावतीने शनिवारी, ४ नोव्हेंबर रोजी चाळीसगावचे तहसीलदार यांच्याद्वारे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आरक्षणाच्या मुद्यांसाठी अनेक नेते लढले आहेत. त्यात प्रामुख्याने स्व.आण्णासाहेब पाटील, स्व.आ.विनायक मेटे यांचा घातपात झाला की अपघात, हे अद्यापही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील सकल मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील आपल्या जिवाची बाजी लावून लढत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्यामुळे त्यांची समाजाला खूप गरज असल्यामुळे त्यांच्या जिविताला धोका संभविण्याची शक्यता अथवा त्यांचा घातपात होवू शकतो. म्हणून महाराष्ट्र सरकारने जरांगे-पाटील यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा पुरविण्याची मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार यांच्याद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. निवेदनावर गणेश पवार, प्रशांत गायकवाड, भरत नवले, खुशाल पाटील, छोटू अहिरे, संजीव पाटील, राजेंद्र पाटील, सुमित कापसे, तमाल देशमुख, बंडू पगार, खुशाल बिडे, दीपक चव्हाण, मिलिंद पवार, नितीन पाटील, सुमित जगताप, विकास गोसावी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here