बाणगाव धरणात पथकातर्फे धडक मोहीम

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

पाण्याचा बेसुमार उपसा होत असल्याने पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाचोरा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी क्षितिज चौधरी यांनी चाळीसगावचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या सहकार्याने बाणगाव येथील धरणात धडक मोहीम राबविली. रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद चव्हाण, ग्रामविकास अधिकारी दिलीप नागरे, क्लर्क गणेश देवरे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना बाणगाव धरणाच्या पाण्याच्या बाबतीत निवेदन दिले होते.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर बाणगाव धरणात अत्यल्प पाणीसाठा असताना खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा बेसुमार उपसा होत होता. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी पाचोरा लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी क्षितीज चौधरी, सहायक अभियंता अक्षय देशमुख, लिपीक देविदास पाटील, वाहन चालक महाजन, चौकीदार अण्णा निकाळे यांच्या पथकाने शनिवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळपासून बाणगाव धरणात धडक मोहीम राबविली.

अनधिकृत २५ मोटारी काढल्या

धरणातील परवानगी दिलेल्या तसेच अनधिकृत अश्‍या २५ मोटारी काढण्यात आल्या. तसेच जेसीबीच्या सहाय्याने साधारण ३० सायपन काढण्यात आले. एमएसईबीचे डिव्हिजनल ऑफिसर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पावरा व त्यांच्या सर्व सहकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत धरण क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित केला. मोहिमेसाठी चाळीसगावचे कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत पाटील यांनीही श्री.चौधरी यांना मदत केली.

लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने केलेल्या कार्यवाहीचे रांजणगावच्या ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. या कामासाठी रांजणगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्यासह बाणगावचे सरपंच अरविंद परदेशी यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here