सफाई कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची विविध मागण्यांसाठी पालिकेत बैठक

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्याकरीता मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे, उपमुख्याधिकारी स्नेहा फडतरे, इतर विभाग प्रमुख यांच्या समवेत अखिल महाराष्ट्र सफाई कामगार, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेची मंगळवारी, ७ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्यात आली. बैठकीत मांडलेल्या विषयांवर लवकरच अंमलबजावणी करणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी जाहीर केले.

बैठकीत नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या मृत व वैद्यकीय दृष्ट्या अपात्र सफाई कामगारांच्या वारसांना जुनी पेन्शन व ग्रॅज्युटी अदा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. १२ व २४ वर्ष सेवा झालेल्या सफाई कामगारांना आश्‍वासित प्रगती योजना लागू केलेली आहे. त्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात येईल. महिला विशाखा समितीमध्ये सफाई कामगारांचे प्रतिनिधी घेण्यात येतील. दुसरा व चौथा शनिवार सुट्टीचा पगार किंवा रोटेशनने सुट्टी देण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेत ४४ घरांचा प्रस्ताव तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगरपालिका प्रशासन संचालनालयाकडे तात्काळ पाठवण्यात येईल. सफाई कर्मचारी राहत असलेली पत्राची चाळ नावावर करण्याबाबत ठराव झालेला आहे. त्यानुसार घरे नावावर करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. रोजंदारी कामगारांना सेवेत कायम केलेले व न्यायालयाचे आदेशाने कायम झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना अनुकंपा व लाड पागे समितीच्या धोरणाचा लाभ देण्यात येईल. याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी निर्णय घेतला.लवकरच याबाबतची अंमलबजावणी करण्याचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांनी जाहीर केले.

बैठकीनंतर संघटनेच्या नाम फलकाचे उद्घाटन नगरपरिषद आवारामध्ये करण्यात आले. तसेच सफाई कर्मचारी वसाहतीमध्ये संघटनेच्या चाळीसगाव शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो सफाई कर्मचारी बांधवांसह भगिनी उपस्थित होते. संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे, राज्य सचिव सुरेश बिसनारिया, राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल, वरिष्ठ समाजसेवक सरजू जावडेकर, संघटनेचे मुख्य मार्गदर्शक चेतन नकवाल, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रशांत नकवाल, चाळीसगाव शाखाध्यक्ष सुभाष चंदेले, प्रेमराज गुजराती, अमन नकवाल यांच्यासह कामगार वर्ग उपस्थित होता. यशस्वीतेसाठी अमन नकवाल, सागर चंदेले, उमेश चव्हाण, शंकर चव्हाण, अजय चंडाले यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here