पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

0
1

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी, ८ नोव्हेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये पाचोरा व भडगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला पाहिजे, मागील वीज बिलाची थकबाकीची रक्कम पूर्णपणे माफ करण्यात यावी, कापूस पिकावर आलेल्या लाल्या रोग व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, सोयाबीन पिकावर आलेला पिवळा मोझक व त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची रक्कम मिळाली पाहिजे, दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्यांची टंचाई भासत आहे. त्यासाठी चारा छावणी सुरू करण्यात याव्यात, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, २०२१ २२ ची विमा कंपनीकडून देय असलेली नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीच्या आत देण्यात यावे, २०२२-२३ ची पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत २५ टक्के अग्रिम रकमेसह संपूर्ण भरपाई रक्कम मिळाली पाहिजे, कृषी केंद्र चालकांच्या संदर्भात राज्य शासनाने नुकतीच नवीन नियमावली जाहीर करून एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखा प्रकार आहे. याबाबतीत पूर्ण विचार करावा, असेही निवेदनात नमूद केले आहे.

नमूद सर्व मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेता शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकारी पाचोरा विभाग, ता. पाचोरा यांच्याकडे करण्यात आली. आंदोलनाला पाचोरा तालुका सीड्स पेस्टिसाइड फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन्स पाचोरातर्फे पाठिंबा देण्यात आला.

धरणे आंदोलनात शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील भडगाव, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेना तालुकाप्रमुख रमेश बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, तालुकाप्रमुख अनिल पाटील भडगाव, शहर प्रमुख अनिल सावंत, तालुका युवा अधिकारी शशिकांत पाटील, शहर युवा अधिकारी पाचोरा मनोज चौधरी, उपजिल्हा संघटिका तिलोत्तमा मौर्य, शहर संघटक राजेंद्र सुरेश राणा, उपजिल्हा युवा अधिकारी माधव जगताप भडगाव, ज्येष्ठ शिवसैनिक पप्पू राजपूत, व्यापारी असोसिएशन के.राजेंद्र बोत्रे, संजय सांगवी, अद्वेत येवले, सुभाष पाटील, अनुज जैन, पप्पू बांटिया, गिरीश राठे, अमित संघवी, राजेंद्र पाटील, प्रदीप परदेशी, संजय चौधरी, अभिषेक खंडेलवाल, मिथुन वाघ, भारत पाटील, ज्ञानेश्‍वर चौधरी, अरुण पाटील, भैय्या पाटील, हेमराज राठोड, उत्तम राठोड, अनिल राऊळ, बाबा वाणी, प्रकाश पाटील, शिवराम पाटील, संजय पाटील, आबा पाटील, सय्यद गफार, जमील रशीद कहर, भगतसिंग पाटील, अरुण तांबे, राजू राठोड, एकनाथ अहिरे, अण्णा महाजन, देविदास पाटील, कैलास पाटील, अजय पाटील, प्यारेलाल पवार, भागवत मापारी, नितीन महाले, सुभाष पाटील, जयश्री येवले, अनिता पाटील, कुंदन पांड्या, नवलसिंह चौहान, प्रेमचंद पाटील, भिकन तडवी, भाऊसाहेब पाटील, दिनेश राजपूत, सुभाष राजपूत, भालचंद्र पाटील, दीपक गायकवाड, शंकर सूर्यवंशी, जाकीर कहाकर, रेहान कहाकर, विजय पाटील, कमलेश मालकर, किरण राजपूत, उमेश पाटील, प्रशांत पाटील, सुनील पाटील, विश्‍वनाथ पाटील, बाळू पाटील, विजय पाटील, दिनकर गीते, सुरेश सूर्यवंशी, संभाजी लिंगायत आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here