Author: Sharad Bhalerao

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील करंजी शिवारातील शेतात शेत रस्ता वापराच्या कारणावरून एका महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करून डोक्यावर काठीने व दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच पती व जेठ यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सविता किरण पाटील (वय ३२) ही विवाहिता वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ तालुक्यातील करंजी शिवारातील शेत गट नंबर १८४ मध्ये शेत आहे. शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्या पती व जेठ यांच्यासोबत शेतात जात असताना शेतातील…

Read More

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी सध्या देशात धर्माधर्मात तेढ निर्माण करून जातीय द्वेष भावनेतून मनुष्याचा छळ करून त्यांना जीवनीशी मारले जात आहे. हिंदू असूनही त्यांना मंदिरात प्रवेश बंदी आहे. “आम्ही हिंदू असूनही त्यांना जातीयवाद्यांकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे. जेव्हा हे हिंदूंच्या लक्षात आले तेव्हा हजारो हिंदूंनी बांधवांनी हिंदू धर्माचा त्याग करून, संपूर्ण देशात पसरलेला पवित्र असा बौद्ध धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, खरे बौद्ध हे धर्मापासून लांब जात असल्याचे चित्र डोळ्यासमोर दिसत असल्याचे प्रतिपादन पू.भदंत सुगतवंश महाथेरो यांनी पू.भदंत सुमनतीस्स यांच्या १८व्या वर्षावास समापन प्रसंगी भगवान बुद्ध टेकडी, आंबेडकर नगर, तापी नदी किनारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रवचन देतांना केले.…

Read More

साईमत, यावल : प्रतिनिधी शहरातील फेगडे कुटुंबियांनी यावल तालुक्यातील आदिवासी विटवा पाडा येथे आदिवासी परिवारासोबत दीपोत्सव साजरा केला.आदिवासी पाड्यावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार घडावे या उद्देशाने सहकुटुंब दिवाळी आपण गरजुंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला असल्याचे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले. विटवा पाडा येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपला दिवाळी सण आदिवासी दुर्गम परिसरातील आदिवासी परिवारासोबत सहकुटुंब साजरा केला. सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील आदिवासी कुटुंब या आनंदापासून दूर असतात. या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी. त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने व येणाऱ्या…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी कोदगाव गणपूर तांडा ते पाटणादेवी व वलठाण फाट्याच्या पूर्वेकडील रस्ता मंजूर असताना वलठाण तांडा ते वलठाण फाटा असा परस्पर बदल करून हा रस्ता फिरविण्यात आला आहे. रस्ता फिरविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने तालुक्यातील वलठाण तांडा येथील ५ शेतकऱ्यांनी ३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी जाऊन शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला रयत सेनेचा पाठिंबा दर्शविला. शासनाला व ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी वलठाण तांडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन देवूनही कोदगाव गणपूर तांडा ते पाटणादेवी व वलठाण फाट्याच्या पूर्वेकडील रस्ता मंजूर असताना वलठाण तांडा ते वलठाण फाटा असा परस्पर बदल करून हा रस्ता फिरविण्यात आला आहे. या प्रकाराला जबाबदार…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी दिवाळीच्या काळात अनेक जण स्वतःची दिवाळी कशी चांगली होईल, त्याचा विचार करतात. मात्र, गौरव कापसे मित्र परिवाराने गरजू मुलांना मिठाईसह अन्य फराळाचे वाटप करून दिवाळीचा उत्साह साजरा करुन गोड केला. यावेळी प्रा.निखिल महाले, डॉ.गणेश पगार, गौरव राजपूत, शुभम माडोळे, दुर्गेश कोष्टी, विवेक पगार, विजय पांगारे आदी उपस्थित होते.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील नीम ते कपिलेश्‍वर मंदिराच्या नूतन भक्त निवासापर्यंत गाव फिडर विद्युत जोडणीसाठी रक्कम अंदाजित २५ लाख मंजूर केले. अमळनेर तालुक्यातील नीम येथील रोहित्रावर जास्तीचा भार असल्याने श्री क्षेत्र कपिलेश्‍वर महादेव मंदिर परिसरात शंभर केव्हीए ट्रान्सफॉर्मर व २५ पोल केबल सहीत जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, एक महिन्याच्या आत विद्युत जोडणीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. मागील आठवड्यात भक्त निवास व विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित होते. त्याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी यांनी श्री क्षेत्र कपिलेश्‍वर मंदिर व परिसरातील भागात विजेची समस्या पालकमंत्री यांना लक्षात आणून दिली होती. ना.गुलाबराव पाटील यांनी भक्तांना…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी स्त्री ही कुटुंबात असेल किंवा नोकरीत मात्र ती आपले संस्काराचे जतन नेहमी करत असते. त्यामुळेच आपली संस्कृती ही अनादी काळापासून आजपर्यंत स्त्री शक्तीमुळेच संस्कृतीचे जतन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस व्ही. जे. एन. टी. सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांनी केले. काँग्रेसतर्फे आयोजित स्त्री शक्तीचा सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले, पल्लवी रेणके यांच्या मार्गदर्शनानुसार विमुक्त जाती, भटक्या जमाती विभाग जळगावतर्फे महिलांचे शैक्षणिक योगदान व बचतगटामार्फत महिलांना स्वयंरोजगासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी काँग्रेस व्ही. जे. एन. टी.सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव यांनी महिलांना भेट वस्तू, विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी नाशिक पोलीस परिक्षेत्रीयतर्फे झालेल्या वादविवाद स्पर्धेत पो.ह. डॉ.शरद पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्याबद्दल अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. मानव अधिकार जनजागृती प्रित्यर्थ नाशिक पोलीस परिक्षेत्रीय वाद विवाद स्पर्धा विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांच्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पो.ह. डॉ.शरद पाटील यांनी प्रतिनिधीत्त्व केले. स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकिकात भर पाडली आहे. डॉ.शरद पाटील यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीचा सन्मान म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांच्या उपस्थितीत डॉ.शरद पाटील…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा, भडगाव तालुक्यातर्फे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावे, अशी मागणी माजी आमदार दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शासनातर्फे लवकरात लवकर दुष्काळग्रस्ताच्या यादीत दोन्ही तालुके समाविष्ट न केल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन, मोर्चा, धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी वजा आवाहन माजी आमदार दिलीप वाघ यांनी केले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या रॅलीने पाचोरा शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी घोषणांनी पाचोरा शहर दणाणून गेले होते. दोन्ही तालुके दुष्काळ जाहीर करावे, अशी मागणी शेतकरी जोरजोराने बोलून दाखवित होते. यापूर्वीही दोन महिन्यांपूर्वी पाचोरा, भडगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. पावसाळ्यात पाऊस…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी राज्याचे मंत्री ना.छगन भुजबळ यांना राज्यपालांनी संवैधानिक शपथ देतांना आणि शपथ घेतांना समाजात कोणत्याही प्रकारचा जातीभेद करणार नाही किंवा कोणाशी वैरभावाने वागणार अथवा वावरणार नाही. मग ना.भुजबळ मराठा समाजाबद्दल कसे काय बोलले? ते व्यक्ती द्वेषाने वागु शकतात. त्यामुळे भुजबळांनी विधानसभा सदस्य व मंत्रीपदाच्यावेळी घेतलेल्या संवैधानिक शपथेची पायमल्ली (उल्लंघन) केल्याचा गुन्हा दाखल व्हावा, त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ७ नोव्हेंबर रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने चाळीसगावचे तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांकडे केली आहे. मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे म्हणून आपल्या जिवाची पर्वा न करता जिवाची…

Read More