शेत रस्त्याच्या कारणावरून महिलेला शिवीगाळसह मारहाण

0
20

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील करंजी शिवारातील शेतात शेत रस्ता वापराच्या कारणावरून एका महिलेला तीन जणांनी शिवीगाळ करून डोक्यावर काठीने व दगडाने मारहाण करून दुखापत केली. तसेच पती व जेठ यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर असे की, भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे सविता किरण पाटील (वय ३२) ही विवाहिता वास्तव्याला आहे. त्यांचे भुसावळ तालुक्यातील करंजी शिवारातील शेत गट नंबर १८४ मध्ये शेत आहे. शुक्रवारी, १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्या पती व जेठ यांच्यासोबत शेतात जात असताना शेतातील शेत रस्ता वापराच्या कारणावरून विष्णू निवृत्ती तळेले, रामा विष्णू तळेले आणि रेखा विष्णू तळेले (सर्व रा. पिंपळगाव बुद्रुक, ता. भुसावळ) यांनी महिला सविता पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच यांच्यासह पती व जेठ यांना जीवेठार मारण्याची धमकी दिली, मोबाईल फोडून नुकसान केले. दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर महिलेने दुपारी २ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विष्णू निवृत्ती तळेले, रामा विष्णू तळेले आणि रेखाबाई विष्णू तळेले या तिघांविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस नाईक प्रमोद कंखरे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here