साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तालुक्यातील नीम ते कपिलेश्वर मंदिराच्या नूतन भक्त निवासापर्यंत गाव फिडर विद्युत जोडणीसाठी रक्कम अंदाजित २५ लाख मंजूर केले. अमळनेर तालुक्यातील नीम येथील रोहित्रावर जास्तीचा भार असल्याने श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात शंभर केव्हीए ट्रान्सफॉर्मर व २५ पोल केबल सहीत जिल्हा वार्षिक योजनेतून उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, एक महिन्याच्या आत विद्युत जोडणीचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
मागील आठवड्यात भक्त निवास व विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला पालकमंत्री उपस्थित होते. त्याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी यांनी श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर व परिसरातील भागात विजेची समस्या पालकमंत्री यांना लक्षात आणून दिली होती. ना.गुलाबराव पाटील यांनी भक्तांना मंदिर परिसरातील रात्री -बेरात्री वीज नसल्याने कुठलीही समस्या येऊ नये म्हणून तात्काळ कार्यवाही करून हे काम एका महिन्यात मार्गी लावा, असेही आदेश दिले आहेत. याप्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी मगन पाटील, कपिलेश्वर मंदिराचे महाराज स्वामी देवेश्वर तीर्थ यांच्याकडे कामाचे पत्र सुपुर्द केले. याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सर्व कपिलेश्वर भक्तांनी आभार व्यक्त केले आहे.