सातपुड्यात आदिवासी बांधवांसोबत फेगडे परिवाराने साजरी केली दिवाळी

0
3

साईमत, यावल : प्रतिनिधी

शहरातील फेगडे कुटुंबियांनी यावल तालुक्यातील आदिवासी विटवा पाडा येथे आदिवासी परिवारासोबत दीपोत्सव साजरा केला.आदिवासी पाड्यावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीस समाजाप्रती दायित्वाचे संस्कार घडावे या उद्देशाने सहकुटुंब दिवाळी आपण गरजुंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला असल्याचे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले.

विटवा पाडा येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी आपला दिवाळी सण आदिवासी दुर्गम परिसरातील आदिवासी परिवारासोबत सहकुटुंब साजरा केला. सर्वत्र दिवाळी साजरी होत असतांना समाजातील अतिदुर्गम भागातील आदिवासी कुटुंब या आनंदापासून दूर असतात. या आदिवासी घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी. त्यांनाही काही क्षण आनंद मिळावा या उद्देशाने व येणाऱ्या पिढीला आपण समाजाप्रती देणे लागतो, असे संस्कार घडावे या उद्देशातून राबवित असल्याचे डॉ.कुंदन फेगडे यांनी सांगितले. तेव्हा आपल्याच सभोवताली अनेक असे गरीब होतकरू लोक असतात की, त्यांना एकावेळेचे जेवणासाठी मोठी कसरत आणि मेहनत करावी लागते, त्यामुळे सण साजरे करणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्यांनाही वाटते की, आपणही गोड खावे, नवीन कपडे घालावे. मात्र, त्यांच्या नशिबी नेहमी अंधार असतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे भान जपत अशा गरजूंना आपण मदतीचा हात द्यावा म्हणून दरवर्षी यावल-रावेर तालुक्यातील आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे हे आदिवासी वस्तीवर जाऊन सहकुटुंब दिवाळी साजरी करीत असतात. यंदा त्यांनी विटवा आदिवासी पाड्यावर जाऊन फराळ, मिठाई आंघोळी करीता सुगंधी उटणे, साबण, पणती लहान मुलांना फटाके वितरण केले. यावेळी डॉ. कुंदन फेगडे, शैलेंद्र फेगडे, डॉ.जागृती फेगडे, दिनेश बारेला, सागर लोहार, मनोज बारी, दीपक फेगडे यांच्यासह आदिवासी बांधवांची परिवारासोबत उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here