साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
दिवाळीच्या काळात अनेक जण स्वतःची दिवाळी कशी चांगली होईल, त्याचा विचार करतात. मात्र, गौरव कापसे मित्र परिवाराने गरजू मुलांना मिठाईसह अन्य फराळाचे वाटप करून दिवाळीचा उत्साह साजरा करुन गोड केला. यावेळी प्रा.निखिल महाले, डॉ.गणेश पगार, गौरव राजपूत, शुभम माडोळे, दुर्गेश कोष्टी, विवेक पगार, विजय पांगारे आदी उपस्थित होते.