वलठाण तांडातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला रयत सेनेचा पाठिंबा

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

कोदगाव गणपूर तांडा ते पाटणादेवी व वलठाण फाट्याच्या पूर्वेकडील रस्ता मंजूर असताना वलठाण तांडा ते वलठाण फाटा असा परस्पर बदल करून हा रस्ता फिरविण्यात आला आहे. रस्ता फिरविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने तालुक्यातील वलठाण तांडा येथील ५ शेतकऱ्यांनी ३ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषण स्थळी जाऊन शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला रयत सेनेचा पाठिंबा दर्शविला.

शासनाला व ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी वलठाण तांडा येथील शेतकऱ्यांनी निवेदन देवूनही कोदगाव गणपूर तांडा ते पाटणादेवी व वलठाण फाट्याच्या पूर्वेकडील रस्ता मंजूर असताना वलठाण तांडा ते वलठाण फाटा असा परस्पर बदल करून हा रस्ता फिरविण्यात आला आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून बडतर्फ करावी, या मागणीसाठी वलठाण येथील ५ शेतकरी ३ दिवसांपासून आमरण उपोषणाला तहसील कार्यालयासमोर बसले आहेत. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला रयत सेनेचा पाठिंबा रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांनी दर्शविला आहे. यावेळी शिरसगावचे दिलीप पाटील, प्रा.चंद्रकांत ठाकरे, निखील राठोड, चांगदेव राठोड, संजय राठोड, मधुकर गायकवाड, रमेश जाधव, डी.एस.मराठे, वलठाणचे पत्रकार कैलास सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here